लडाखमधील वादाला चीन जवाबदार..अमेरिकेची प्रतिक्रिया
वॉशिंग्टन, २ जुलै : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून कठोर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. शिवाय, सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाला चीनलाच जबाबदर धरण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर म्हटलं आहे की, “भारत-चीन सीमेवर चीनची आक्रमक भूमिका ही जगातील अन्य भागातील चीनच्या आक्रमकतेच्या पॅटर्नशी सुसंगत आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचा खरा स्वभाव दिसून येतो.” भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाइट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भूमिका होती. पण प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला फटकारल्याचे वॉशिंग्टनमधील भारत-अमेरिका संबंधांच्या अभ्यासकांनी सांगितले.
१५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर पूर्व लडाखमधल्या परिस्थितीवर अमेरिकेचे अत्यंत बारीक लक्ष आहे. “भारत आणि चीन दोघांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याला आमचा पाठिंबा आहे” असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवाने म्हटले आहे.
भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. या बंदीमुळे भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,” असं त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.
News English Summary: India was backed by several countries after the violence in the Galvan Valley in eastern Ladakh. Now the US has backed India and the White House has reacted strongly to the issue.
News English Title: India was backed by White House after the violence in the Galvan Valley in eastern Ladakh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH