15 January 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैन्यात धक्काबुक्की; लष्कराची कुमक वाढवली

indian army, chinese army, India China Border, Ladakh

लडाख: एकीकडे पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण असताना बुधवारी भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार लडाखमध्ये घडला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. १३४ किलोमीटर लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला.

दरम्यान या क्षेत्रात भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्याला चीनच्या सैनिकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. यानंतर दोन्ही देशांनी या क्षेत्रात सैनिकांची संख्या वाढवली होती.

भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. या भागातील भारतीय जवानांच्या उपस्थितीचा चिनी सैन्यानं विरोध केला. यानंतर दोन्ही देशाचे जवान एकमेकांना भिडले. त्यांच्यात काही वेळ धक्काबुक्की झाली. यानंतर या भागातील लष्कराची कुमक वाढवण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्यांमधील संघर्ष सुरू होता.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x