२ महिन्यांपासून आंदोलन | ६० शेतकऱ्यांचा मृत्यू | रिहानाच्या ट्विटने शांत झोपलेल्यांना जागं केलं

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये अजय देवगण सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अँपचा अँबेसिडर आहे. अक्षय कुमार एक अघोषित मोदी भक्त आहे. लता मंगेशकर यातर मोदींना मोठे बंधू मानतात आणि अमित शाह यांनी भाजपच्या ‘संपर्क पे चर्चा’ अभियानावेळी तर लता दीदींच्या घरी विशेष भेट दिली होती. तर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे बीसीसीआय’शी संबंधित असल्याने आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा सध्या बीसीसीआय’चे सचिव आणि अघोषित सर्वेसेवा झाले आहेत. यावरून कोहली आणि अर्जुन तेंडुलकरच्या भविष्यासाठी सचिनची अवस्था समजू शकतो. त्यात सायना नेहवाल’ने तर अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मात्र मागील दोन महिने झोपलेल्या या भारतीय सेलिब्रिटींना रिहानाच्या ट्विटनंतर जाग आल्याची टीका सुरु झाली आहे. कारण मागील दोन महिन्यात याच आंदोलनात तब्बल ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यावर हे सर्व भारतीय सेलिब्रिटी तोंड उघडण्याचं धाडस करत नव्हते. पण रिहानाचा इतिहास जाणून घेतल्यास ती केवळ भारतातील लोकशाही मूल्यांवर बोलली नसून तिने जगभरातील अशा विषयांवर ट्विट केला आहे. मात्र भारतातील या सेलिब्रिटींचा तसा कोणताही इतिहास नाही. अगदी म्यानमार मध्ये लष्कराने जेव्हा तिथली संसद ताब्यात घेतली तेव्हा देखील रिहाना व्यक्त झाली आहे.
my prayers are with you #myanmar! https://t.co/GMYqA5BHM8
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं यापूर्वी अनेकदा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर भाष्य केले आहे. रिहानाने कोविड रिलीफपासून HIV, एड्स जागरूकता, कॅंसर रिसर्च विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्चशिक्षण देण्यापर्यंत अनेक मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जनहिताच्या मुद्द्यावरून केलेल्या कार्याबद्दल Harvard University ने २०१७ मध्ये रिहानाला Humanitarian of the Year या पुरस्काराने गौरवलं आहे.
News English Summary: Farmers have been protesting on the Delhi border for the last two months against the agriculture bill implemented by the central government. The government and farmers have held 11 rounds of discussions so far but the farmers are adamant on withdrawing the bill. This is why the farmers’ movement has now become a topic of discussion at the international level.
News English Title: Indian celebrity wake up after tweet of Rihaana on Delhi farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK