लस कोरोनापासून संरक्षण करेल, संसर्गही रोखेल पण...पुढे काय म्हणाले बिल गेट्स

वॉशिंग्टन, २६ जून : कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सर्वच देशात सुरू आहे. मात्र लसीचा शोध लागण्यानंतरही आपल्याला कोरोनाची बाधा होणारच नाही, अशी खात्री देता येणार नाही, अशी भिती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
या मुलाखतीत बिल गेट्स म्हणाले की, या वर्षाखेर अथवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोनाची लस शोधली जाईल. ही लस कोरोनापासून मानवाचं संरक्षण करेल आणि संसर्गही रोखता येणार आहे. मात्र या लसमुळे कोरोनाची बाधा होणारच नाही, अशी खात्री देता येणार नाही. तसेच, सध्या कोरोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता आहे. अशावेळी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती, गरोदर महिलांवर चाचणी करण्यासाठी वेळ नाही. अशा परिस्थितीत योग्य, अचूक माहिती संकलित करणे हे कठीण काम आहे.
Bill Gates predicts coronavirus will “be back in big numbers” in October and November “if we don’t restrain our behavior more than it looks like we are right at the moment.” #CNNTownHall https://t.co/GMAoOhJ5TO pic.twitter.com/CQqWtsi4pU
— CNN International (@cnni) June 26, 2020
दरम्यान, कोरोनावर अनेक देश लस आणि औषध बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी संशोधन करत असलेली कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आहे. ही लस यशस्वी व्हावी म्हणून युरोपसह अनेक देश प्रयत्न करत आहेत. ही लस मिळवण्यासाठी आतापासूनच युरोपातील अनेक देशांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबाहेर रांगा लावल्या आहेत. तर काही देशांनी लसीसाठी नोंदणी देखील केली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या AZD- 1222 या लसीची ज्या लोकांवर चाचणी घेतली. त्याचे रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. गेल्याच आठवड्यात इटली, जर्मनी फ्रांस आणि नेदरलँडने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी कडे ४० कोटी डोसची नोंदणी केली आहे. सरकारी मान्यतेनंतर लवकरच खूप कमी वेळेत अस्ट्रेझेंका या कंपनीमार्फत लसीचे लाखो डोस तयार केले जात आहेत. याबाबत अमेरिका आणि ब्रिटनने आधीच या कंपनीसोबत करार केला आहे. हेल्थ मॅनेजमेंट ओआरजी’ने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
इटलीच्या आरोग्यमंत्र्यांनीही ऑक्सफर्डची लस सर्वात आधी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ब्रिटन, स्वित्झर्लंड नॉर्वे सोबत भारतात देखील ही लस तयार केली जात आहे. सध्या जगभरात १० लॅबमध्ये लस बसनविण्याचे काम सुरू आहे. यात ऑक्सफर्डने तयार केलेली लस अंतिम टप्प्यात आहे. तरीही ही लस संपूर्ण जगभरात पोहचण्यासाठी किमान सहा महिने वाट पहावी लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
News English Summary: Attempts to find a vaccine against corona are on the rise across the country. But even after the invention of the vaccine, you can’t be sure that the corona will not be infected, said Bill Gates, the founder of Microsoft.
News English Title: International Coronavirus there is no guaranty for covid 19 vaccine prevent coronavirus infection said Bill Gates News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON