16 April 2025 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

Kabul Airport Attack | दहशतवाद्यांना जबर किंमत मोजावी लागेल, सोडणार नाही - जो बायडेन

Kabul airport attack

मुंबई, २७ ऑगस्ट | अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 जण ठार झाले आहेत तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेनुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या खुरासान गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितले की, मृतांमध्ये 12 सागरी कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी आहेत. काबूल विमानतळावरून सर्व उड्डाणे ऑपरेशन स्थगित करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांना जबर किंमत मोजावी लागेल, सोडणार नाही, जो बायडेन यांचा इशारा – ISIS Kabul airport attack terrorist will be punished said US president Joe Biden :

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी 3 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हे विमानतळाजवळच घडले, असे म्हणता येणार नाही. दारुलमन परिसरातही जोरदार गोळीबार झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनने सांगितले – गुरुवारी पहिला स्फोट हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अबे गेटवर झाला. थोड्याच वेळात, विमानतळाजवळील बॅरॉन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते. तीन संशयित विमानतळाबाहेर दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते, तर तिसरा बंदूक घेऊन आला होता. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यामध्ये काही अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसह काही लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दशतवाद्यांना दिला आहे.

काबूल विमानतळावर हल्ल्यामागे ISIS-K चा हात आहे. हा हल्ला घडवणाऱ्या ISIS-K ला आणि अमेरिकेला नुकसान पोहचवण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि शिक्षा देऊ असे बायडेन म्हणाले. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच राहिल. अफगाणिस्तान असलेल्या अमेरिकन नागरिकांची आम्ही सुटका करू. आमचे मिशन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्यात येईल, असे बायडेन म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ISIS Kabul airport attack terrorist will be punished said US president Joe Biden.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#America(22)#JoeBiden(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या