18 January 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

हा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump, Corona Crisis, Covid 19

वॉशिंग्टन, २३ एप्रिल: हा काही फ्ल्यू नाही. हा तर अमेरिकेवर झालेला हल्ला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ही भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्यावर हल्ला झालाय. हा काही फ्ल्यू नाही. आतापर्यंत कोणीच भूतकाळात असे काही पाहिलेले नाही. त्यामुळे हा हल्लाच आहे.

तसेच मी नेहमी सर्व गोष्टीमुळे चिंतेत असतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येचं निरसण करायचं आहे. जगातील सर्वाधिक चांगली अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. चीनपेक्षा उत्तम आहे. मागील ३ वर्षात आम्ही मेहनतीनं हे सर्व उभं केलं आहे आणि अचानक हा व्हायरस येतो अन् सर्व बंद करायला भाग पाडतो. आता आम्ही पुन्हा हे खुलं करत आहोत, पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने आम्ही यातून उभारी घेऊ फक्त त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेवरील वाढत्या कर्जासंदर्भात प्रश्नाचं उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून सरकारला लोक आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर करावं लागत आहे. यामुळे कर्जाच्या रकमेत वाढ होत असल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं.

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये ४७ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८,५२,००० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.

 

News English Summary: This is not a flu. This is an attack on the United States, said US President Donald Trump. He made the remarks at an occasional press conference at the White House. “We are under attack,” Donald Trump said. This is not a flu. So far no one was able to send in the perfect solution, which is not strange. So this is an attack.

News English Title: It was not just a flu US was attacked says US President Donald Trump.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x