14 January 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांच्याकडून १२ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर

जेनोआ : इटलीची राजधानी जेनोआ येथे आलेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याने मोरांडी पूल कोसळला आहे. परंतु त्यामुळे पूलाखालील असलेल्या वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुर्दैवाने या भयानक अपघातात तब्बल ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांनी १२ महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्य पावलेल्या लोकांसाठी जवळपास ४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर बचावकार्य सुद्धा जोरात सुरु असून परिस्थिती कशी आटोक्यात आणली जाईल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

जिनोआमध्ये अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यात मंगळवारी मुसळधार पावसाबरोबरच वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने मोरांडी पुलाचा मोठा म्हणजे जवळजवळ ६०० फुटाचा भाग कोसळला. त्यात ३५ गाडय़ा आणि अनेक ट्रक ४५ मीटर खाली असलेल्या रेल्वे मार्गावर कोसळल्या, यात ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोरांदी पुलाच्या देखरेखीची जबाबदारी ऑटोस्ट्रेड या कंपनीवर देण्यात आली होती. त्यामुळे या कंपनीची मान्यताही काढून घेण्यात येणार असून, पुलाची जबाबदारी असलेल्या ऑटोस्ट्रेड कंपनीला १५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x