22 January 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

VIDEO | तिकडे पवार पावसात भिजले आणि | आता अमेरिकेत बायडन सभेवेळी भिजले

Joe Biden, Continued Rally in Rain, US Election 2020

वॉशिंग्टन, ३० ऑक्टोबर: महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा.

वास्तविक त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी भाजपाची दर्पोक्ती त्याच्या अंगलट आली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं. आमच्यासमोर सर्वच संपले आहेत हा अहंकारी आत्मविश्वास भाजपाला नादाला आणि राज्यात पवारांमुळे चमत्कार घडला होता. तसंच काहीस अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घडल्याने ट्रम्प सरकार जाणार तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

आता अशीच एक सभा अमेरिकेत झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत गाजत आहे. अमेरिकेत तीन दिवसांनंतर मतमोजणी आहे. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावला आहे. नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे.

बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे पाठिराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही, अशा प्रकारची ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहेत. अनेकांना बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. ‘हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल,’ असं शीर्षक त्यांनी फोटोला दिलं आहे.

 

News English Summary: With just three days to go before the counting, both current US President Donald Trump as well as former vice-President and current Presidential candidate, Joe Biden, took to holding rallies in Florida. Campaigning hours apart in Florida, a state all but essential to the Republican’s pathway to another term, both candidates urged supporters to get to polling places in person, even as a tropical storm interrupted early voting in the Southeast. “You hold the power. If Florida goes blue, it’s over,” Biden told supporters Thursday. Trump and Biden both visited the western end of the Florida’s Interstate 4 corridor, an area known for rapid residential growth, sprawling suburbs and its status as an ever-changing, hard-fought battleground during presidential elections.

News English Title: Joe Biden Continued His Rally Despite Pouring Rain and Its Winning the Internet News updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x