22 November 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पाऊस पडला इतिहास घडला | जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष | मोदींचे मित्र पराभूत

Joe Biden, Democratic Party, US presidential election 2020

वॉशिंग्टन, ८ नोव्हेंबर: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन ( joe biden ) अखेर विजयी झाले आहेत. यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेचे जनतेला संबोधित करत संदेश दिला. अमेरिकेच्या जनतेने माझ्यावर आणि आपल्या सहकारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. संपूर्ण देशाने एकजूट होण्याची हीच योग्य वेळ आहे, असं जो बायडन देशवासियांना संबोधित करताना म्हणाले. बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी हा पुढच्या वर्षी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पार पडणार आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी बायडन यांना अधिकृतरीत्या विजयी घोषित केलं. यानंतर बायडन यांनी पहिल्यांदाच आपलं जाहीर मत व्यक्त केलं. देशातील जनतेने आपल्यावर आणि कमला हॅरीस यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला सन्मानित आणि गौरव झाल्यासारखा वाटतोय, असं बायडन म्हणाले.

प्रचंड अडथळ्यांचा सामना करत अमेरिकेच्या जनतेने प्रचंड प्रमाणात मतदान केलं. लोकशाही अमेरिकेच्या हृदयात खोलवर रुजली आहे, हे यातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. प्रचार संपल्यानंतर ही वेळ आता संताप आणि कठोर वक्तव्य सोडून एक राष्ट्र म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची आहे. ही अमेरिकेला एकजूट करण्याची आहे, असं आवाहन बायडन यांनी देशवासियांना संबोधित करताना केलं.

 

News English Summary: Joe Biden of the Democratic Party has finally won the US presidential election. Joe Biden then addressed the American people. We are extremely proud of the confidence that the American people have placed in me and our fellow Vice Presidential candidate, Kamala Harris. “This is the right time for the whole country to unite,” Biden said. Biden will be sworn in as President on January 20, 2021.

News English Title: Joe Biden of the Democratic Party has finally won the US presidential election 2020 News updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x