18 April 2025 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

भारताच्या अडचणी वाढणार | श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना बहुमत

Mahinda Rajapaksa, SLPP, Sri Lanka Parliamentary polls, Victory

कोलंबो, ०७ ऑगस्ट : भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळालं आहे. आज आलेल्या निकालांमध्ये श्रीलंकेतील २२५ जागांपैकी केवळ श्रीलंका पीपल्स पार्टीनं १४५ जागांवर विजय मिळवला. तर सहकारी पक्षांसोबत त्यांचा एकूण १५० जागांवर विजय झाला आहे. पक्षाला एकूण ५९.९ टक्के मतं मिळाली.

दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. रहिस सिंह म्हणतात, “राजपक्षे हे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात चीन समर्थक राहिले. त्यांनी श्रीलंकेचे चीनच्या उपनगरीत रूपांतर केले. राजपक्षे यांच्या मते आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेच धोरण पुढेही सुरू ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे चीन आपल्यावर सतत हल्ला करत आहे. एकीकडे त्याला लडाखमधील जमीन ताब्यात घ्यायची आहे, तर ड्रॅगनच्या भारताच्या शेजारी देश नेपाळ, बांगलादेशातही कुरबुरी सुरू आहेत. नेपाळही भारताला डोळे दाखवायला लागला आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने आहे, बांगलादेश आणि चीनमधील मैत्री वाढत आहे.

राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केलं जाणार असल्याचंही मोदी म्हणाले. राजपक्षे यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. “फोनवरून अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत दोन्ही देशांमधील अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य यांना पुढे नेण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. श्रीलंका आणि भारत हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी राष्ट्र आहेत,” असंही ते म्हणाले.

 

News English Summary: In Sri Lanka, India’s neighbor, Prime Minister Rajapaksa’s Sri Lanka People’s Party has once again won a majority. In today’s results, out of 225 seats in Sri Lanka, only the Sri Lanka People’s Party won 145 seats.

News English Title: Mahinda Rajapaksa led SLPP registers landslide victory in Sri Lanka Parliamentary polls News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaSriLanka(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या