22 February 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

अमेरिकेत कोरोनाचं थैमान, २४ तासात ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण

Covid 19, America, Corona Crisis

वॉशिंग्टन, ८ जुलै : जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत एकूण ६०२०९ नवीन रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त १११४ मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यूची संख्या आता १.३१ लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या जवळपास ३१ लाखांवर आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाबतीत गेल्या एका आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे आणि दररोज सरासरी ५० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत जवळजवळ सर्व काही उघडलेले आहे आणि लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय वावरत आहेत.

तसेच अमेरिकेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या बर्‍यापैकी जास्त आहे. अमेरिका दररोज सुमारे ५ लाख चाचण्या करत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीस कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४८२ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता ७ लाख ४ हजारांवर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा २० हजार ६४२ इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनाच्या २ लाख ६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भारतात एक लाखामागे ५०५ करोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी १४५३ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ८५६०, ७४१९, ५३५८, ४७१४, ४२०४, ३९९६ आणि १९५५ इतके लोक कोरोनबाधित झाले आहेत.

 

News English Summary: The corona virus has become even more terrible in the world. About two lakh new patients are added every day. In the United States, things are getting worse. In the last 24 hours, more than 60,000 new patients have been registered here. Which is the highest record to date.

News English Title: More than 60 thousand covid 19 cases increase in America in last 24 hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x