18 January 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा

Mumbai City, Rising seas, Mumbai at Risk till 2050

नवी दिल्ली: समुद्रातील पाण्याचा स्तर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याचा स्तर सतत वाढत असल्यामुळं २०५० पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याचा स्तर वाढल्यामुळं जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. या १५ कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे.

या रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या स्तराची गणना करण्यात आली आहे. यावरून हा स्तर वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं येत्या काळात अनेक शहरं जगाच्या नकाशावरून गायब होतील, अशी भीती याआधीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीला उपग्रहातून घेतलेल्या फोटोंच्या आधार आहे. यानुसार २०५० पर्यंत जगातली बरीचशी शहरं पाण्याखाली गेलेली असतील. या भागावर सध्या १५ कोटी लोक वास्तव्यास आहेत. आधी सात बेटांवर वसलेल्या, त्यानंतर भराव टाकून एकत्र करण्यात आलेल्या मुंबईलादेखील पाण्याच्या वाढत्या पातळीचा फटका बसणार आहे.

आतासारखी परिस्थिती कायम राहिली, जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आली नाही, तर २०५० मध्ये मुंबई कशी दिसेल, याचे फोटो संशोधनातून समोर आले आहेत. त्यानुसार पुढच्या ३१ वर्षांत दक्षिण मुंबई पाण्याखाली जाऊ शकते. समुद्राची पातळी वाढल्यास व्हिएतनामला सर्वाधिक फटका बसेल. २०५० पर्यंत व्हिएतनामचा दक्षिण भाग पूर्णपणे पाण्याखाली असेल. याचा फटका २ कोटी लोकांना बसेल. हो ची मिन्ह (व्हिएतनाम), बँकॉक (थायलँड), शांघाय (चीन), अलेक्झांड्रिया (इजिप्त), बसरा (इराक) या शहरांना जागतिक तापमान वाढीचा मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x