23 December 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार | त्या ट्विटनंतर फ्रान्स ट्विटरवर भडकला

Muslims Have Right, French People, Malaysia's Ex PM Mahathir Mohamad

पॅरिस, ३० ऑक्टोबर: फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.

महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर फ्रान्सने पूर्वी मुसलमानांवर जे अत्याचार केले, त्यासाठी मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांची कत्तल करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.

परंतु काही वेळानंतर त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. त्यांच्या या ट्वीटनंतर फ्रान्सकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “नुकतीच ट्विटर फ्रान्सच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा झाली आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचं ट्विटर खातं त्वरित निलंबित केलं जाणं आवश्यक आहे. तसं नसल्यास ट्विटर हा हत्येच्या औपचारिक आवाहनाचा एक साथीदार ठरेल.” असं मत फ्रान्सच्या डिजिटल क्षेत्राचे राज्य सचिव कॅड्रिक ओ यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, या घटनेचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहे. मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रझा अकादमीकडून (raza academy ) फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स पायदळी तुडवण्यात आले आहे. मुंबईतील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या भेंडी बाजार भागात फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांचे पोस्टर्स रस्त्यावर पाहण्यास मिळाले. रस्त्यावर ठिकठिकाणी मॅक्रॉन यांचे पोस्टर लावण्यात आले होते. रझा अकादमीने हे कृत्य केले आहे. रझा अकादमीच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

News English Summary: Former Malaysian Prime Minister Mahathir Mohamad on Thursday said Muslims have the right “to be angry and to kill millions of French people for the massacres of the past”. His comment was part of a blog, which was also posted on Twitter. It was later removed from the microblogging site for violating rules. Mohamad’s remark came shortly after three people were killed in a knife attack at a church in France’s Nice city.

News English Title: Muslims Have Right To Be Angry Kill Millions Of French People Says Malaysias Ex PM Mahathir Mohamad France Gave Statement News updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x