23 November 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशा मंजूर, उत्तराखंडमधील तीन भूभागांवर दावा

Nepal upper house, New map, Kalapani, Limpiyadhura and Lipulekh

नवी दिल्ली, १८ जून: भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना आज नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयकावर मतदान होणार आहे. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे.

नेपाळने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने आज नॅशनल असेंब्लीत ५७ मते पडली. तर विरोधात कुणीही मतदान केले नाही. त्यामुळे हे विधेयक नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारीत झाले. मतदानादरम्यान, संसदेतील विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी-नेपाळ यांनी घटनेच्या तिसऱ्या अनुसूचित बदल करण्यासंबंधीच्या सरकारच्या विधेयकाला पाठिंबा दिला.

त्याआधी काल नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल पूर्ण चंद्र थापा यांनी कालापानी जवळ चांग्रु येथे उभारण्यात आलेल्या चौकीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याच्यावेळी सशस्त्र पोलीस दलाचे शैलेंद्र खानाल जनरल थापा यांच्यासोबत होते. नेपाळ सीमेची जबाबदारी सशस्त्र पोलीस दलाकडे आहे. मानसरोवर यात्रेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आठ मे रोजी धाराचुला-लिपूलेख मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर नेपाळ सशस्त्र पोलीस दलाची चौकी चांग्रु येथे बांधण्यात आली.

दरम्यान, नॅशनल असेंब्लीत पारित झाल्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा घटनेत समावेश केला जाईल. तसेच राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या नकाशाचा समावेश महत्त्वपूर्ण कागदपत्रांमध्ये केला जाईल.

 

News English Summary: Amid heightened tensions on the Indo-China border, Nepal’s upper house is set to vote today on a bill to approve a new map. Nepal claims the Indian territories of Kalapani, Limpiyadhura and Lipulekh in Uttarakhand. For this, Nepal has also amended its map.

News English Title: Nepal upper house is set to vote today on a bill to approve a new map with Kalapani, Limpiyadhura and Lipulekh in Uttarakhand News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x