17 April 2025 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

हुकुमशाहा किम जोंग संतापला | कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला गोळ्या घातल्या

North Korea, Kim Jong Un, killed citizen, Corona restriction

प्योंगयांग, ५ डिसेंबर : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांचा निर्दयी स्वभावच पुन्हा एकदा अनुभव जगाला आला आहे. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Guidelines) प्रतिबंधासाठी लागू केलेल्या कडक नियमांचं एका नागरिकाने उल्लंघन केल्याने, त्याला सर्वांसमोर थेट गोळी घालण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, देशातील नागरिकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने (North Korea) चीन सीमेवर एन्टी एयरक्राफ्ट बंदुका देखील तयार ठेवल्या आहेत, आणि नियम तोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुकुमशाहच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

रेडियो फ्री एशियाच्या हवाल्याने डेली मेलने याबाबत वृत्त दिलं आहे, 28 नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सेनेने हुकुमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानंतर एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडण्यात आलेला व्यक्ती, कोरोना काळातील नियम मोडून चीनमधून सामानाची तस्करी करताना आढळला होता.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीने किमने आपल्या सर्व सीमा मार्च महिन्यापासून अधिकृतपणे बंद केल्या आहेत. अवैधपणे कुठेही जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्या व्यक्तीला थेट गोळ्या घालण्याचं पाऊल उचलण्यात आलं.

 

News English Summary: The brutal nature of North Korean dictator Kim Jong Un has once again come to light. A citizen has been shot in public for violating strict rules for the prevention of the Corona Virus Guidelines. Shockingly, North Korea has also set up anti-aircraft guns on the Chinese border to intimidate the country’s citizens, and has been ordered to shoot at the moment they see violators. These actions of the dictator have created an atmosphere of terror among the people.

News English Title: North Korea Kim Jong Un killed the citizen not following corona restriction news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#North Korea(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या