23 February 2025 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

चिंता वाढली: ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना लस चाचणीत अपयश

oxford scientist, covid 19, vaccine test fails

लंडन, २१ मे: जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जगात कोरोनाने ५० लाख ३८ लोकांना संक्रमित केलं आहे. ज्यामध्ये ३ लाख २८ हजार १७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. आतापर्यंत येथे १५.५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दुसरीकडे भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५६०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून रोज 5 हजाराहून अधिक रुग्ण वाढू लागले आहेत. देशात सध्या ६३ हजार ६२४ जणांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील मोडर्ना कंपनीने कोरोनापासून मुक्ती बनविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत कोरोना व्हायरसविरोधात लस विकसित केल्यामुळे जगभरात एक आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेत आठ स्वयंसेवकांवर कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी करण्यात आली. त्याला बऱ्यापैकी यश मिळाले. पण आता दुसऱ्या बाजूला एक निराश करणारी बातमी सुद्धा आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली “ChAdOx1 nCoV-19” लस माकडांवर निष्प्रभ ठरली आहे. या लसीला माकडांमध्ये इन्फेक्शन रोखता आलेले नाही. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूट ही लस विकसित करत आहे. करोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.

ज्या माकडांना –ChAdOx1 nCoV-19 ही लस देण्यात आली होती. त्यांचा जेव्हा Covid-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरस बरोबर सामना झाला, तेव्हा शरीरात इन्फेक्शन पसरले असे डॉ. विलियम हासीलटाइन यांच्या हवाल्याने डेली एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. हे यूकेमधील वर्तमानपत्र आहे. “लस टोचण्यात आलेल्या आणि ज्यांना लस दिली नाही अशा माकडांमधील व्हायरल आरएनएच्या प्रमाणात फार फरक नव्हता. याचा अर्थ लस दिली त्यांनाही इन्फेक्शनची बाधा झाली” असे डॉ. विलियम म्हणाले.

 

News English Summary: The “ChAdOx1 nCoV-19” vaccine, developed by Oxford University in the UK, has been shown to be effective against monkeys. This vaccine does not prevent infection in monkeys. This was reported by Indian Express. The vaccine is being developed by the Jenner Institute at Oxford University.

News English Title: oxford scientist covid 19 vaccine fails to stop infection in animal trials News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x