महत्वाच्या बातम्या
-
YouTuber Ryan | यावर्षी टॉईज रीव्ह्यू मधून २२० कोटीची कमाई
रेयान काजीचे खरे नाव रेयान गौन आहे. फोर्ब्सने सांगितल्यानुसार, 2018 मध्येही व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन कमाई करण्याच्या बाबतीत रेयान टॉपवर होता. मागील वर्षी रेयानने 22 मिलीयनची कमाई केली होती. त्याचे चॅनेल ‘रेयान्स वर्ल्ड’ 2015 मध्ये लॉन्च झाले होते. त्यावेळेस त्याचे वय फक्त 3 होते. फक्त 5 वर्षात त्याचे 22.9 मिलीयन सब्सक्रायबर झाले. रेयान लहान मुलांच्या खेळण्यांची अनबॉक्सिंग आणि त्याच्याशी खेळतानाचा लहान व्हिडिओ बनवतो. त्याचे आई-वडील हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. या चॅनेलला सुरुवातीला रेयान टॉइज रीव्ह्यू नावाने सुरू केले होते, नंतर चॅनेलचे नाव बदलले.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना | केंद्राची तातडीची बैठक | विमानसेवांवर बंदीची शक्यता
भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Coronavirus Strain) नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगभरात Gmail, Google आणि YouTube बऱ्याच वेळानंतर पूर्ववत
भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जीमेल (Gmail) अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यू-ट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते. मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत
4 वर्षांपूर्वी -
पृथ्वीच्या नष्ट होण्याचं वर्ष ठरलं | तापमानही निश्चित | न्यूटनच्या पत्राचाही आधार - संशोधन
पृथ्वीचं आयुष्य नेमकं किती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जगभरात सध्या वारेमाप वृक्षतोड होत असताना जागतिक तापमानात होत असणारी वाढ देखील पृथ्वीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जंगल तोड होण्याच्या बाबतीत देशासहित जगभरात बोटावर मोजता येतील इतकीच लोकं जंगल आणि वृक्षांचं महत्व जाणतात. आपल्या देशातील मोजक्या लोकांना सोडल्यास अनेकांना तर जंगलतोड बद्दल काहीच आस्था नसून त्याचे परिणाम देखील माहित नसणं हे देखील मोठं चिंतेचं कारण आहे. पृथ्वीबद्दल ज्योतिषशास्त्राचे अंदाज विचारात न घेणं आपण समजू शकतो. मात्र भूगर्भ शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि वैज्ञानिकांचे संशोधनातून समोर आलेले आकडे दुलक्षित करणं वेडेपणाचं लक्षण म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक अमेरिकेत संकटात | ..तर Instagram आणि Whatsapp विकण्याची वेळ येईल
अमेरिकन सरकारने आणि अमेरिकेतील तब्बल 48 राज्यांनी फेसबुकविरोधात समांतर खटले दाखल केले आहेत. या आरोपामध्ये सोशल मीडिया कंपनीने बाजारात मोनोपॉली निर्माण करून छोट्या स्पर्धकांना संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) आणि 48 राज्यांतील ऍटर्नी जनरलने फेसबुकवर कायदेशीर खटला दाखल केला आणि त्यानंतर फेसबुकच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | गैरसमज पसरत आहेत | घाबरू नका, सत्य समजून घ्या
सुरुवातीला म्हणजे चीनच्या हुवानं शहरातून कोरोना जगभरात पसरायला सुरुवात झाल्याच्या वृत्तानंतर अनेक गैरसमज देखील पसरण्यास सुरुवात झाली होती आणि परिणामी लोकांमध्ये जनजागृती होण्या ऐवजी भीती निर्माण झाली. आता कोरोना लसीकरण सुरु झाल्यनंतर देखील विनाकारण गैरसमज पसरवले जातं आहेत आणि त्यामुळे चिंता वाढू शकते. मात्र मिळलेल्या अधिकृत माहितीनुसार घाबरण्याचं आणि चिंता करण्यासारखं काहीच नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात | ९० वर्षांच्या आजींना पहिली लस दिली
भारतात कुणाला पहिली कोरोना लस (Covid19 Vaccine) मिळणार याची प्रतीक्षा आहेच. मात्र 90 वर्षांच्या आजींनी (90 year old grandmother) जगातील पहिली कोरोना लस (covid 19 vaccine) घेतली आहे. ब्रिटनमध्ये (Great Britain) फायझर (Pfizer Company) आणि बायोएनटेकच्या (BionTech Company) कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान (Senior Citizen Women Margaret Keenan) यांनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही | WHO'चं शुभं वक्तव्य
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. तर कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश झाला आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
हुकुमशाहा किम जोंग संतापला | कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला गोळ्या घातल्या
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांचा निर्दयी स्वभावच पुन्हा एकदा अनुभव जगाला आला आहे. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Guidelines) प्रतिबंधासाठी लागू केलेल्या कडक नियमांचं एका नागरिकाने उल्लंघन केल्याने, त्याला सर्वांसमोर थेट गोळी घालण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, देशातील नागरिकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने (North Korea) चीन सीमेवर एन्टी एयरक्राफ्ट बंदुका देखील तयार ठेवल्या आहेत, आणि नियम तोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुकुमशाहच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus | पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय
टीम इंडियाने (Indian Cricket Team Tour of Australia 2020-21) पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा (India Cricketer Ravindra Jadeja), थंगारासू नटराजन (India Cricketer Thangarasu Natrajan) आणि युजवेंद्र चहल (India Cricketer Yuzvendra Chahal) ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.
4 वर्षांपूर्वी -
CND'ने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं | मोदींच्या नव्या भारताचंही समर्थन
आतंरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची घटना घडली आहे ज्याचा जगावर आणि भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी या संबंधित निर्णय जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० | सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा पुरस्कार
शाळा ही पहिली गुरू आहे असं म्हणतात. शिक्षक शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला घडवतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील (Solapur ZP school teacher Ranjeet Singh Disle won Global Teachers award 2020) शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी (7 crores Prize) रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गलवान खोऱ्यात भारताविरोधात हिंसाचार हा चीनचा कट | अमेरिकेचा दावा
चीनचा खरा विघातक चेहरा पुन्हा जगासमोर समोर आला आहे. अमेरिकेने याबाबत खुलासा केल्याने जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. भारत चीनच्या सीमेवरील लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराचा कट चीनने आखला असल्याचे अमेरिकेच्या संसदीय समितीच्या (US parliamentary committee on Galvan Valley in Ladakh Indo-China border) अहवालात स्पष्ट म्हटले आहे आणि त्यामुळे चीन तोंडघशी पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी | पुढील आठवड्यापासून लस देणार?
ग्रेट ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला (Pfizer and Bioentech’s Corona vaccine) अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला अधिकृत मंजुरी देणारा ग्रेट ब्रिटन पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. परिणामी ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाला कॅनडाच्या पंतप्रधानांचा पाठिंबा | भारत सरकारचं प्रतिउत्तर
नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे आता थेट परदेशातून या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
एक भौगोलिक आश्चर्य | या शहरात सूर्य मावळल्यावर ६६ दिवसांनंतरच उगवतो - सविस्तर वृत्त
जगभरात आश्चरचकीत करणारी अनेक ठिकाणं आहेत आणि त्यातही काही आश्चर्यांमधील आश्चर्य म्हणावी लागतील. मात्र जर त्या आश्चर्याचं कारण स्वतः भौगोलिक स्थिती असेल तर विचारायलाच नको. तसंच आहे जगातील एक आश्चर्यचकित करणार शहर आणि तिथली भौगोलिक स्थित असच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प अजून धक्क्यातून सावरले नाहीत | म्हणाले 'मी निवडणूक जिंकलो'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन ( joe biden ) हे विजयी झाले. यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेतील जनतेला संबोधित देखील केलं. अमेरिकेच्या जनतेने माझ्यावर आणि आपल्या सहकारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. संपूर्ण देशाने एकजूट होण्याची हीच योग्य वेळ होती, असं जो बायडन देशवासियांना संबोधित करताना म्हटले होते. बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी हा पुढच्या वर्षी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटर क्वीन पुन्हा बरळली | जो बायडन यांची खिल्ली उडवत ‘गजनी' म्हणाली
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी ऐतिहासिक विजय मिळवत रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. तसेच, सलग तीन दिवस सुरु असलेली मतमोजणीने संपूर्ण जागाच लक्ष अंतिम निकालांकडे लागलं होतं. जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये २० जानेवारी रोजी प्रवेश करतील.
4 वर्षांपूर्वी -
पाऊस पडला इतिहास घडला | जो बायडन नवे राष्ट्राध्यक्ष | मोदींचे मित्र पराभूत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन ( joe biden ) अखेर विजयी झाले आहेत. यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेचे जनतेला संबोधित करत संदेश दिला. अमेरिकेच्या जनतेने माझ्यावर आणि आपल्या सहकारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. संपूर्ण देशाने एकजूट होण्याची हीच योग्य वेळ आहे, असं जो बायडन देशवासियांना संबोधित करताना म्हणाले. बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी हा पुढच्या वर्षी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाउडी मोदी इव्हेन्ट आणि प्रचंड पैसा वाया जाणार | आता बायडेन सरकारसाठी जुळवा जुळवी?
काही महिन्यांपूर्वी भारतात आणि तत्पूर्वी अमेरिकेत निवडणुकीच्या अनुषंगाने आणि अमेरिका स्थित भारतीय मतदारांच्या मतांसाठी हाउडी मोदी इव्हेन्ट सारखे मेगा इव्हेन्ट आयोजित केले होते. अगदी थेट परदेशातून लाईव्ह शो देखील करण्याचे जणू काही माध्यमांना आदेशच होते. मात्र सध्याची अमेरिकेतील निवडणुकीची स्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी या दोघांचं राजकरण फोल ठरलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH