महत्वाच्या बातम्या
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वकिलांच्या फी साठी घरातले सर्व दागिने विकले | मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहे कोरोना रुग्ण | नवे फिचर येणार
गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे (Google Map). या फिचरला ‘COVID लेअर’, असे नाव देण्यात आले आहे. गुगलप्ले हे नवे फिचर अँड्राईड आणि आयओएस, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणार आहे. यात युझर्सना केवळ कोरोना संक्रमितांची माहितीच मिळणार नाही, तर कोरोनाशी संबंधित अपडेटदेखील मिळतील.
4 वर्षांपूर्वी -
FinCEN Files | भारतासह जगभरात राजकीय भूकंप होणार | १९९९ ते २०१७ मधील घोटाळे-अफरातफर
घोटाळे, अफरातफर आणि करचोरीच्या माध्यमातून देशात झालेल्या तब्बल दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओ शाबजी ! चीनने नेपाळची जमीनही हडपली | बांधल्या ९ इमारती
चीनची जमीन हडपण्याची भूक शांत होताना दिसत नाहीय. चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली आहे. चीनने केवळ नेपाळच्या जमीनीवर कब्जाच केला नाहीतर तिथे ९ इमारती देखील बांधल्या. दुसरीकडे चीन नेपाळला आपला जवळचा मित्र म्हणतो.
4 वर्षांपूर्वी -
भारत-चीन वादात रशियाची मध्यस्ती | पुतीन यांची आशिया खंडासाठी वेगळी योजना
भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या वादात रशियाने केलेल्या मध्यस्थीमुळे अनेक देश हैराण झाले आहेत. या वादात अमेरिकेपेक्षा रशियाने अधिक सक्रीय भूमिका बजावली. मॉस्कोत झालेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत-चीन दरम्यान बैठक पार पडली. भारत-चीनला एक व्यासपीठ दिले असून याद्वारे सीमा प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो, असेही रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये भारताची ३८ हजार स्क्वे किमी जमीन चीनच्या ताब्यात | मोदी सरकारची कबुली
भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत निवदेन सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असंही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक | मोदींचा नवा भारत ७९ क्रमांकावरून १०५ वर घसरला - अहवाल
काही दिवसांपूर्वी पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण असल्याचं समोर आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पँगाँग फिंगर ८ पर्यंत भारताची हद्द | मात्र चिनी सैन्य फिंगर ८ पासून फिंगर ४ पर्यंत घुसल्याच वृत्त
मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तासाची चर्चा झाल्यानंतरही दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशातील सैनिक लडाखमध्ये शस्त्र आणि दारूगोळा घेऊन ३०० मीटर दूर आमने-सामने उभे आहे. याच दरम्यान जपान आणि ताइवान या दोन देशांनी चीनला आपल्या देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ | तैवानची चीनला धमकी
एकीकडे चीन-अमेरिका आणि भारत-चीननंतर आता आणखी देशानं चीनची कोंडी करण्यात सुरुवात केली आहे. चीनच्या शेजारी देश असलेल्या तैवाननं चीनला धमकी दिली आहे. तैवानचे (Taiwan) उपराष्ट्रपती लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांनी चीनला मर्यादा ओलांडण्याची चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तैवानने स्पष्टपणे सांगितले आहे की, चिनी लढाऊ विमाने सीमेचे सतत उल्लंघन करीत आहेत आणि असेच सुरू राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. चिनी लढाऊ विमानांनी तैवान सीमेवर आतापर्यंत तीन वेळा घुसखोरी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांच्या हातात तलवारी-भाल्यासारखी हत्यारे | चिनी युद्ध सदृश्य वातावरण करतोय
सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्ने केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये पुन्हा तणाव वाढला | भारतानं वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा चीनचा आरोप
मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचं मला समर्थन | अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील - डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते सध्या चांगलं काम करत आहेत. असे वक्तव्य अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याधर्तीवर ट्रम्प संबोधित करत होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fact Check | तैवानने चीनचा विमान पाडलं नाही | तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या लढाऊ विमान सुखोईला पाडल्याचा दावा तैवानने शुक्रवारी केला आहे. चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तैवाननं ते विमान पाडलं, या घटनेत पायलट जखमी झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
घराच्या सिलिंगवर दोन अजगरांच्या भांडणामुळे सिलिंगचा काही भाग कोसळला
ऑस्ट्रेलियामध्ये एका घराच्या सिलिंग वर खेळणार्या दोन अजगरांच्या मस्तीमुळे काही भाग कोसळल्याची घटना समोर आहे. क्वीन्सलॅन्डमध्ये Laceys Creek परिसरात राहणार्या David Tait याच्या घरातील हा प्रसंग आहे. सोमवारी घरी परतल्यानंतर त्यांना डायलिंग टेबलवर सिलिंगचा एक भाग कोसळल्याचं चित्र दिसलं. डेविडला घरातच सुमारे 2.8 आणि 2.5 मीमी लांबीचे दोन अजगर वावरताना दिसले. त्यांचं वजन अंदाजे 22 किलो आहे. किचनमध्ये जमिनीवरूनच ते लिव्हिंग रूम आणि बेडरूममध्ये सरपटत जाताना दिसले. त्यानंतर त्याने स्ट्रिव्हन ब्राऊन या सर्पमित्राला बोलावून घरातून भलेमोठे साप बाहेर काढण्यासाठी त्याची मदत घेतली.
4 वर्षांपूर्वी -
माध्यमांकडून फेक न्यूज | चिनी सैनिकांच्या कबरी १९६२ मधील | जोडली गलवान खोऱ्याशी
गलवान खोऱ्यात १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या भीषण सामोरामुळे २० भारतीय सैन्य जवान ठार झाले. दुसरीकडे, चिनच्या बाजूने नेमकं काय नुकसान झालं याची कोणतीही अधिकृत माहिती चीन सरकारकडून देण्यात आली नव्हती. केवळ निरनिराळ्या बाजूनी अंदाज बांधण्यात आले होते, ज्याला कोणताही पुरावा नव्हता. भारतीय माध्यमांनी देखील केवळ अंदाजच मांडले होते. मात्र आता भारतीय माध्यमांना याच विषयाला अनुसरून चुकीचे फोटो प्रसिद्ध करून फेक न्युज पसरविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याशी स्पर्धा कराल तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल - चीनची धमकी
भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ड्रॅगनचा हेतू शंका घेण्यासारखा | लडाखजवळ आधीच तैनात केली J-20 फायटर विमाने
भारत चीन यांच्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेला तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवर भाष्य | डेटा सायन्सची भूमिका
जगभरात डेटा सायन्समुळे धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीत फेसबुक आणि गुगलसारख्या डेटा सायन्सवर आधारित कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली असून, भारतातील सर्वात मोठ्या उद्योगात थेट गुंतवणूक केल्याने त्यांचा राजकीय पाया देखील सध्या घट्ट झाला आहे. दरम्यान जगभरातील तज्ज्ञ फेसबुकचा प्रसार म्हणजे थेट लोकशाहीसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - उडणारी कार | जपानी कंपनीकडून पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण
लहानपणी कॉर्टुन बघताना तुम्ही उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील आणि 21 व्या शतकात त्या फ्लायिंग कार्स सत्यात अवतरणार आहेत. जपानी कंपनी स्कायड्राईव्ह फ्लॉयिंग कार (SkyDrive Flying Car) बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. या फ्लॉयिंग कार्सची चाचणी करण्यात आली आहे. या कारमध्ये फक्त एका व्यक्तीला बसवून जमिनीपासून काही फूटांवर हवेत ही कार उडवण्यात आली. सुमारे 4 मिनिटे या कारची टेस्टिंग करण्यात आली. कंपनीची ही प्रगती बघता येत्या 3-4 वर्षात फ्लॉयिंग कार बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS