महत्वाच्या बातम्या
-
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
अमेरिकेत अवैधरीत्या घुसणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी देशाच्या दक्षिण मेक्सिको सीमेवर मोठी भिंत उभारण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलो आहोत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संकेत दिल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ भारताचे ५ गडी बाद
न्यूझीलंड दौर्यावर असलेला भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून चौथ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असून या मालिकेत सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी देखील भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
NZ Vs IND न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय
हॅमिल्टन वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. दरम्यान, पहिले तीन एकदिवसीय सामने गमावल्यानंतर किवींनी होम ग्राउंडवर पहिला विजय संपादित केला आहे. तसेच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय क्रिकेट संघाच्या अक्षरशः चितड्या उडवल्या. भारताचा संपूर्ण संघ केवळ ९२ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला.
6 वर्षांपूर्वी -
जगातील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुह, एकमेव भारतीय ब्रँड
टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या शंभर ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुहाला ८६ व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा १०४ व्या स्थानावर होता. तर अॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.
6 वर्षांपूर्वी -
ICC T20 वर्ल्ड कप २०२०; आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा एकाच वर्षी वेगवेगळ्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार खेळलेल्या जाणार आहेत. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
PNB घोटाळा; चोक्सीचे नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही : अँटिग्वा सरकार
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आमच्या देशाचे दिलेले नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही, असे अँटिग्वा सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतातील बहुचर्चित पीएनबी घोटाळ्यातील आरोप मेहुल चोक्सी याला भारतात आणताना केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियन ओपन २०१९; सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच ठरला विजेता
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच टेनिसपटू राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने ज्योकोविचने नदालला धूळ चारली आहे. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांचे विक्रम मोडीत काढत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तान दरम्यान 'पाणीबाणी'; पाणी वाद पेटण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाण्यावरुन तिढा वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ५९ वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पाणीवाटपाचा करार झाला. दरम्यान, सदर कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत. त्यामुळे लवकरच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सुद्धा प्रतिष्ठेचा करणार यात शंका नाही.
6 वर्षांपूर्वी -
भारताची तुफान फलंदाजी, ३२४ धावांचा डोंगर रचला
भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. दरम्यान आज भारतीय फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी करत यजमानांना मोठे लक्ष दिले आहे. रोहित शर्मा ८७ आणि शिखर धवनच्या ६६ धावांच्या जोरावर मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी केली. तसेच विराट कोहली ४३ आणि अंबाती रायुडू ४७ यांनी धावांची खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद ३२४ धावांचा डोंगर रचला.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिका: बँकेतील गोळीबारात ५ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील फ्लोरिडात एका बँकेत करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेत झालेल्या गोळीबारात तब्बल ५ निरपराधांचा मृत्यू झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्रकार गौरी लंकेश EVM हॅकिंगची पोलखोल करणार होत्या, त्याआधीच त्यांना ठार करण्यात आले
ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने आधीच देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता अजून काही दावे करण्यात आले आहेत. कारण परदेशी हॅकर सैयद शुजाने पुढे अजून काही दावे करताना म्हटले की, हैदराबाद स्थित भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला भेटायाला गेलेल्या माझ्या टीमच्या ११ मित्रांची सुद्धा हत्या करण्यात आली. ही संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करण्यासाठी गेली होती, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ; भारतासमोर केवळ १५८ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वनडेमध्ये चमकदार कामगिरी करून दाखविल्यानंतर आता विराट कोहलीचा भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये सुद्धा फॉर्मात असल्याचे दिसते. कारण आजपासून ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय संपादन करण्यासाठी विराट टीम सज्ज झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेक्सिकोत गॅस पाइपलाइन फुटून ७१ जणांचा मृत्यू
मेक्सिकोमधील हिडाल्गो शहरात चोरी करण्याच्या प्रयत्नात मुख्य गॅस पाइपलाइन फुटून शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अग्नी तांडवानंतर झालेल्या भीषण स्फोटात तब्बल ७१ निरपराधांचे प्राण गेले आहेत. भीषण आगीमुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि अजून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. दरम्यान, या धक्कादायक दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह जवळपास १०० टक्के जळाल्याने अनेकांना ओळखणेच कठीण होऊन बसले आहे.
6 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus 3rd ODI : भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय
महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा एकदा महत्वाची फलंदाजी केली आहे. कारण आज सुद्धा धोनीने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने जोगरबाज खेळ करत विजयी कळस चढवला. चहलने ६ विकेट घेतल्या.
6 वर्षांपूर्वी -
चहलच्या फिरकीसमोर कांगारूंचा डाव गडगडला, भारतासमोर २३१ धावांचं आव्हान
कसोटी मालिकेपाठोपाठ आता वनडे मालिका देखील जिंकून भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कांगारूंनी अक्षरश: नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार
भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराकडून पाकचे १२ बंकर्स उद्ध्वस्त, ५ रेंजर्संना कंठस्नान
जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानला चांगला दणका देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या ५ जवानांना आज ठार करण्यात आलं असून पाक सैन्याचे अनेक बंकर्स सिद्ध भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही पहिली सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्झिट’ अमान्य; थेरेसा मे यांना जोरदार धक्का
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ‘ब्रेक्झिट’ करार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी जोरदारपणे फेटाळून लावला आहे. काल ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान पार पडले. या मतदानाच्या प्रक्रियेत एकूण ४२३ मते ही कराराच्या विरोधात पडली तर २०२ मते ही कराराच्या बाजूने झुकली आणि इथेच थेरेसा मे यांना जोरदार धक्का बसल्याचे दिसून आले.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी महिला एजंटकडून तब्बल ५० भारतीय जवानांविरुध्द हनी ट्रॅप?
भारतीय लष्कराच्या तब्बल ५० जवानांविरुद्ध हनी ट्रॅप लावला गेल्याचे भारतीय लष्कराच्या प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान, या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय आणि महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरविण्यात आल्याचा संशय भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा
अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘शटडाउन’ सुरू आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमाभागाचा दौरा केला. त्यानंतर केलेल्या पाहणीत त्यांनी देशात थेट आणीबाणी लादण्याचा इशारा पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल