महत्वाच्या बातम्या
-
IPL 2021 | MI vs CSK पहिला सामना आज | कुठली टीम बाजी मारणार?
IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धला दिमाखात सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली मॅच खेळली जाईल. IPL मधील दोन दिग्गज टीममध्ये तगडा मुकाबला होणार आहे. एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स आणि दुसरीकडे मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | आजपासून IPL सुरु | संध्या. 7:30 वाजता पहिला सामना
आयपीएल-२०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ दुबईत रविवारपासून होत आहे. पहिल्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्सदरम्यान लढत होत आहे. आयपीएलसोबतच दुबईच्या बाजारपेठांत उत्साह दिसून येत आहे. ग्राउंडमध्ये तिकिटांच्या विक्रीसह हॉटेल्स, बार व रेस्तराँच्या मार्केटमध्येही उत्साह दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Instagram is Toxic For Girls | इन्स्टाग्राम ठरते आहे मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे साधन - मोठा खुलासा
फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म “इन्स्टाग्राम’ मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे एक साधन ठरत आहे. या प्लॅटफॉर्मची मालकी असलेली कंपनी फेसबुकलाही याबाबत सर्व माहिती आहे. परंतु, फेसबुकने याबाबतच्या अंतर्गत अहवालांकडे केवळ दुर्लक्ष केले असे नाही, तर हे अहवाल दाबून टाकण्याचा प्रयत्न केला.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा | कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती
अमेरिकेत एकूण बाधितांपैकी एक चर्तुथांश रुग्णांत लहान मुलांचा समावेश आहे.‘अमेरिकी ॲकडेमी ऑफ पीडियाट्रिक्स ॲड द चिल्ड्रन हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार गेल्या दीड वर्षात देशातील सुमारे ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा झाली असून जुलै महिन्याचा विचार केल्यास तब्बल ७ लाख ५० हजारापेक्षा अधिक मुलांना संसर्ग झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Virat Kohli Steps Down T20 World Cup Captaincy | विराट कोहली T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार
टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी -
Time Magazine 2021 | नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचा समावेश | ममतादीदींचा 'झुंजार नेतृत्व' असा उल्लेख
प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने २०२१ मधील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी ६ गटांत आयकॉन्स, पायोनिअर्स, टायटन्स, आर्टिस्ट, लीडर्स व इनोव्हेटर्स श्रेणींमध्ये विभागली आहे. वेगवेगळ्या श्रेणींमध्ये भारतातील ५ जण आहेत. सर्वात प्रभावशाली नेत्यांत अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव आहे. तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही आहेत. राजकीय नेत्यांत चकित करणारे नाव म्हणजे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी.
3 वर्षांपूर्वी -
Microsoft Chatbot Talk To Dead People | मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत बोलल्याचा भास करून देणारे मायक्रोसॉफ्टचे चॅटबॉट
विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने त्याचे पेटंट घेतले आहे. ही कल्पना अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ब्लॅक मिररमधून सुचली आहे. यात मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते.
3 वर्षांपूर्वी -
iPhone 13 Launch | १ हजार GB पर्यंत स्टोअरेज, सिनेमॅटिक मोड | किमतींतही बदल नाही
जगातील नंबर-१ टेक्नाॅलॉजी कंपनी ॲपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली. यात २ आयपॅड, ॲपल वॉच सिरीज-७ आणि ४ आयफोनचा समावेश आहे. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात कंपनीने दावा केला की, आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन-१३ ची मॉडेल्स १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १,००० जीबी (१ टीबी) स्टोअरेजसोबत येतील.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी नवीन विधेयकाची तयारी | फीस देऊन नागरिकत्त्वाचा मार्ग होऊ शकतो मोकळा
अनेक वर्षांपासून अमेरिकेचे नागरिकत्व शोधत असलेल्या लोकांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन संसद एका विधेयकावर विचार करत आहे ज्यामध्ये ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या लोकांना काही शुल्क आणि काही अटी पूर्ण केल्यानंतर नागरिकत्व मिळेल. खरंतर, विधेयक अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागू शकतो. ग्रीन कार्डचा बॅकलॉग खूप मोठा असतो आणि लाखो लोक विशेषत: आयटी व्यावसायिक त्याला बळी पडतात. त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कामाच्या व्हिसाचे नूतनीकरण करावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत | मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ | इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट रिपोर्ट
ऑगस्टमध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने मुंबईचा जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत समावेश केला. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्र वेगळीच कहाणी सांगते. मुंबईत ४ महिन्यांत महिलांवरील अपराध १३३% वाढले आहेत. वरिष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘मुंबई पोलिस आपली सर्व ऊर्जा सुशांतसिंह व राज कुंद्रा प्रकरणात लावत आहे. दिल्ली निर्भया प्रकरणानंतर मृत्युदंडाचा कायदा झाला. मात्र आजवर किती दोषींना फासावर लटकावले?
3 वर्षांपूर्वी -
पंजशीरमध्ये 600 तालिबानी मारले गेले | तालिबानला ISI चालवतेय | अमरुल्लाह सालेहचा आरोप
पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्स यांच्यातील लढाई सुरूच आहे. दरम्यान, रेजिस्टेंस दलाने दावा केला आहे की, त्यांनी 600 तालिबान मारले आणि 1000 तालिबान एकतर आत्मसमर्पण केले किंवा शनिवारी पकडले गेले. अल जझीराच्या एका अहवालात म्हटले आहे की तालिबानने सांगितले की, ते पंजशीरची राजधानी बझारक आणि प्रांतीय गव्हर्नर कंपाऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लँडमाईन्समुळे पुढे जाऊ शकले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
Tokyo Paralympics 2020 | प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी डबल धमाका करत SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. प्रमोदने सुवर्ण तर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं.
3 वर्षांपूर्वी -
भारताची तालिबानबरोबर चर्चा | कतारमध्ये घेतली भेट
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर भारताने प्रथमच या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दोहा येथे भारताच्या राजदूतांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली असून अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या शरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय राजदूतांनी कतारची राजधानी दोहा येथे तालिबान नेत्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत लहान मुलांवर कोरोनाचा कहर | 7 दिवसात 1.80 लाख मुलांना कोरोना | श्वासाचाही त्रास | डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द
अमेरिकेतील 34 राज्यांमध्ये मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. पहिल्यांदाच, रुग्णालयांमध्ये गंभीर आजारी मुलांची गर्दी होत आहे. या मुलांचे वय दोन महिने ते 12 वर्षे आहे. मात्र, अनेक रुग्णालयांना उपचार देणे कठीण होत आहे. सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत आहे. एक म्हणजे साथीच्या आजारामुळे ते आपल्या पालकांपासून दूर आहेत आणि आजारपणामुळे त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. गंभीर आजारी मुलांना ऑक्सिजन दिला जात आहे. अनेक मुले व्हेंटिलेटरवर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेकडून ISIS च्या ठिकाणांवर ड्रोनने हवाई हल्ला | काबूल स्फोटांचा मास्टरमाईंड ठार
अमेरिकेने ड्रोनच्या सहाय्याने अफगाणिस्तानातील इसिस (ISIS) च्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हा हवाई हल्ला केला आहे. काबूल विमानतळावरील स्फोटांचा मुख्य सूत्रधार इसिसच्या खुरासन गटाच्या एका दहशतवाद्याला ठार मारल्याचा दावाही केला जात आहे. त्याचबरोबर अमेरिकेने आपल्या नागरिकांना ताबडतोब काबूल विमानतळ सोडण्यास सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kabul Airport Attack | दहशतवाद्यांना जबर किंमत मोजावी लागेल, सोडणार नाही - जो बायडेन
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 जण ठार झाले आहेत तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेनुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या खुरासान गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितले की, मृतांमध्ये 12 सागरी कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | राणेंचा राष्ट्रभक्तीला हात | तर राष्ट्रगीताबाबतीत मोदींकडूनही घडली होती चूक | मग विरोधकही...
नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलंच आक्रमक झाले आहेत. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारतामधील कोरोना महामारीचा अंत जवळ आला | जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांचा अंदाज
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून भारतीयांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतामधील कोरोनाच्या स्थितीवरून दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाची स्थिती महामारीवरून (पॅन्डिमिक) एन्डिमिसिटी होत असल्याचा अंदाज डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. एन्डिमिक अवस्थेत रोग असल्यास नागरिक या रोगासोबत जगण्याचे शिकतात.
3 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानच्या माजी IT मंत्र्यावर जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीची वेळ | फोटो व्हायरल
अफगाणिस्तानचे माजी IT मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा विकत आहेत. पिझ्झा कंपनीचा ड्रेस परिधान करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबरोबर ते देश सोडून जर्मनीला गेले होते. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेलफोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते.
3 वर्षांपूर्वी -
अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? | पगडी, हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झाला आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आलेले नाही.अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही तोपर्यंत सरकार स्थापन करणार नाही, असे तालिबाननं जाहीर केल आहे. दुसरीकडे तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांनी पगडी आणि हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH