महत्वाच्या बातम्या
-
विराट कोहली व अजिंक्य रहाणेची संयमी खेळी, भारत सुस्थितीत
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रानं आरबीआयच्या कामात हस्तक्षेप करू नये: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
RBI आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयादरम्यान मागील अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकारानंतर IMF’चे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड सदर प्रकरणावर जाहीर भाष्य केलं आहे. सर्मप्रथम RBI ने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर भारतातील केंद्र सरकारनं दयायला हवी. तसेच संबंधित सरकारने केवळ राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात हस्तक्षेप केलेलं आम्ही खपवून घेणार नाही, असं मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी अधिकुतपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला चांगलीच चपराक बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कांगारुंची झुंज अपयशी, विराटसेनेचा यजमानांवर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने कांगारूंवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. कांगारुंपुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा दुसरा डाव २९१ धावांतच गुंडाळला. ऑलराऊंडर पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी जोमाने केली करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. भारताच्या तेज गोलंदाजीपुढे कांगारुंचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांवर १-० अशी आघाडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट गडगडला, सेन्सेक्समध्ये ५७२ अंकांची घसरण, २.२८ लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. हाती ते;आलेल्या बातमीनुसार सेन्सेक्स तब्बल ५७२ अंकांनी खाली घसरला आहे. तर निफ्टीत सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे एवढे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीने भारताचा डाव सावरला
येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डावात मोठ्या अडचणीत सापडला होता. दरम्यान, होमपीचवर ऑस्ट्रेलियन टीम भारतीय खेळाडूंना सहज मात देईल असे वाटत होते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळी करत पहिल्यांदा भागीदारी करत भारताला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुजाराच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आणि टीमचा जीव भांड्यात पडला.
6 वर्षांपूर्वी -
कर्ज फेडतो, पण व्याज नाही देणार, कर्जबुडव्या माल्याचा बँकाकडे प्रस्ताव
सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रयासाठी फरार झालेल्या विजय माल्याने बँकांना कर्जाची परतफेड करण्याची दर्शवली आहे. परंतु त्याने घातलेली अट बँका मान्य करणार का प्रश्न आहे. त्याने ठेवलेली अटी नुसार मी केवळ मुद्दल परत करू शकतो परंतु त्यावरील व्याज परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताचा सर्वात अवजड उपग्रह जी.सॅट-११ चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती
भारताचं सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जी.सॅट-११ चं आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तब्बल ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी पहाटे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो भारतातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल आणि त्यामुळे देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह इतका विशाल आहे की, प्रत्येक सोलार पॅनल ४ मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुम एवढा असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
जी-२० परिषद: काळ्या पैशांविरोधात सर्वांनी एकत्र यावे: मोदींचे आवाहन
अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे, असे मत भारताच्या पंतप्रधानांनी जी२० परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना दिले. शुक्रवारपासून ब्यूनस आयर्स येथे सुरु झालेल्या जी-२० सदस्य देशांच्या शिखर परिषदेत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची विशेष भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
नाणार'वर यूएईच्या राजदूतांचं वक्तव्य; भाजप-शिवसेना सरकारकडून दगा फटक्याची शक्यता?
निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरीयेथील बहुचर्चित नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला कालच महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना प्रणित युती सरकारने स्थगिती दिली आहे. तशी अधिकृत घोषणा फडणवीसांनी बुधवारी विधिमंडळात केली होती. परंतु, धक्कादायक म्हणजे या घोषणेला अवघे २४ तास सुद्धा उलटत नाहीत तोपर्यंत, सदर प्रकल्पासाठी पुढच्या काही आठवड्यातच आम्हाला (अॅडनॉक कंपनी) महाराष्ट्र सरकारकडून जमीन मिळणार दिली जाणार आहे, असे यूएई अर्थात दुबईच्या राजदूतांनी राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोकडून ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात झेपावले
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने आज आणखी एक विक्रम केला आहे. ISRO ने PSLV-C43 अर्थात पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकल या रॉकेट लाँचरच्या सहाय्याने भारताच्या हाइपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाईटसहित इतर आठ देशांचे तब्बल ३० उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपीत करणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण भारताने फेटाळले
भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक-करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, मोदी सरकारने पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण नाकारले असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोठं यश! नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळावर यशस्वी लँडिंग
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचे (NASA) “इनसाइट” (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती नुसार सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री एक वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर यशस्वीरीत्या उतरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचं बक्षीस
आज मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल १० वर्षे पूर्ण होत असली तरी या हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधार तसेच दोषींवर कारवाई न होणे म्हणजे पीडितांचा अपमानच म्हणावा लागेल. युनो’च्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे षडयंत्र रचणारे खरे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तान सरकारची मुख्य जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यासाठी बक्षिसा सुद्धा अमेरिकेकडून मोठी वाढ करण्यात आली असून ती तब्बल ३५ कोटी इतकी करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये सुद्धा राफेल डील चौकशीच्या कचाट्यात येणार ? मीडियापार्ट
भारतामध्ये राफेल करारावरून आधीच अडचणीत आलेलं नरेंद मोदी सरकार आता अजून अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता भारताप्रमाणे फ्रान्समध्ये सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात तशी चौकशी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेने दाखल केलेल्या तक्रारी प्रमाणे भारत आणि फ्रान्स दरम्यान सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या तब्बल ५९,००० कोटीच्या राफेल लढाऊ विमानांच्या डीलची सखोल चौकशी करण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा: मेरीकोमची अंतिम फेरीत धडक
जागतिक ख्यातीची भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने तिच्या कारकिर्दीतील ६व्या विश्वविजेतेपदासाठी नवी दिल्ली येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने सहज पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महिला ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप; भारतीय महिला टीमचे आव्हान संपुष्टात
महिलांच्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडच्या महिला टीमकडून पराभव झाला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून इंग्लंड टीम समोर ११३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु, इंग्लंडच्या टीमने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. आता अंतिम सामान्यतर इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलिया टीमसोबत पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
युनिसेफकडून सुप्रिया सुळेंचा पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव
राष्ट्रवादीच्या खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा युनिसेफ या जागतिक संघटनेने ‘पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेन’ने गौरव केला आहे. अनेक अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रिया सुळे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल युनिसेफने घेतली आहे. त्याच्या या कार्याची दखल खुद्द संयुक्त राष्ट्र संघाने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंगापूर: गुंतवणुकीसाठी भारत उत्तम ठिकाण : पंतप्रधान
सिंगापूर सध्या फिनटेक फेस्ट सुरु असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की,”आज तंत्रज्ञानाच्या ताकदीची व्याख्या बदलत असून यात तरुणांचं मोलाचं योगदान आहे. तरुणांची एकूण क्षमता आणि त्यांच्या ऊर्जेवर विश्वास दाखवला पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधानांनी भाषणादरम्यान केले. तसेच उपस्थित फिनटेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना भारतात गुंतवणुक करण्याचे जाहीर निमंत्रण सुद्धा दिले.
6 वर्षांपूर्वी -
हास्यास्पद स्पष्टीकरण; रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव आमच्याकडून मिळेल: दसॉल्ट
विषय हा होता की, संरक्षण संदर्भातील लढाऊ विमान निर्मिती क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देणं हवाई दलासाठी धोकादायक आहे, असा आक्षेपदेखील राहुल गांधींनी घेतला होता. त्यावर सुद्धा एरिक यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘आमच्या कंपनीकडे प्रशिक्षित अभियंते तसेच कर्मचारी आहेत. तर दुसरीकडे भारतातील अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी या क्षेत्रात नवोदित आहे. दसॉल्टसोबतच रिलायन्सदेखील या प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव मिळेल,’ असं दसॉल्टच्या सीईओंनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
फेक न्यूज व मोदींच्या आजूबाजूच्या घडामोडींमध्ये परस्परसंबंध असल्याचा निष्कर्ष: बीबीसी
बीबीसी न्यूजने केलेल्या एका संशोधनानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिक ‘राष्ट्र उभारणी’च्या उद्देशाने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या मोठ्या प्रमाणावर शेअर करतात. राष्ट्रवादासंदर्भातील संदेश पसरवणे त्यांना स्वतःचे कर्तव्य वाटते असं म्हटलं आहे. दरम्यान, भारत देशाची प्रगती, हिंदुशक्ती तसेच हिंदू गतवैभवाला झळाळी अशा विषयां बद्दलची खोटी माहिती कोणतीही खात्री न करता मोठ्या प्रमाणावर पुढे पाठवली जाते असं समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH