भारतीय लष्कर सज्ज, तर पाकिस्तान-चीनी लष्कर मोठा दगा करण्याच्या तयारीत
लेह, ५ जुलै : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या हिंसाचारनंतर लडाखमध्ये एलएसीवर भारतीय वायुसेना हाय अलर्टवर आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉरवर्ड बेसवर जाऊन चीनविरोधात रणशिंग फुंकले. तसेच, भारतीय वायुसेनाच्या विविध विमानं सीमेवर तैनात आहेत.
वायुसेनेच्या फॉरवर्ड एअर बेसवर प्रचंड गस्ती घालण्यात आली असून वायुसेनेच्या युद्ध विमानं येथे तैनात आहेत. विमानांमधून सैनिक आणि सामानाला लडाखच्या विविध भागात पोहोचवलं जात आहे. बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या मिग २९ विमान, अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत.
वायुसेनेच्या या फॉरवर्ड एअर बेसने चीनवर नजर ठेवण्यासाठी मल्टी रोल कॉम्बेट, मिराज २०००, सुखोई ३० आणि जग्वारही तैनात आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान एकत्र मिळून भारतासोबत मोठा दगा फटका करण्याच्या तयारीत असल्याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील कोतली, रावलाकोट, विंभर, बाग, मुझफ्फराबाद यासह अनेक ठिकाणी पाकिस्ताननं अतिरिक्त बटालियन तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाकिस्तानने आपली शक्ती दुप्पट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानने पीओकेमधील कोतली येथे तीन ब्रिगेडसह २८ पीआर (पाकिस्तान रेजिमेंट) आणि ४० आरटी तैनात केले आहेत. त्याशिवाय रावलाकोट येथे २ ब्रिगेडसह ९ पीआर, विंभर येथे तैनात ४ ब्रिगेडसह १५ लाइट इन्फ्रंटीला कार्यरत केले आहे. ६ ब्रिगेडसह २२ पीआर आणि १० एनएलआय (नॉर्दर्न लाइट इन्फंट्री) आणि ५ ब्रिगेड, २१ सिंध रेजिमेंट बागेवर तैनात आहेत. विशेष म्हणजे इराण सीमेवर पीआर तैनात करण्यात आले होते, तेथून त्यांना पीओके येथे हलविण्यात आले आहे. नियंत्रण रेषेवरील कोणतेही मोठे षडयंत्र पाकिस्तान अंमलात आणू शकते.
यात नियंत्रण रेषा पलिकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये रात्रभर दिवे विझवून पाकिस्तानी लष्कराची वाहनं आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या हालचाली वाढवण्यात चीनचा मोठा हात आहे. चीन भारताला दुहेरी मार्गाने घेरण्याचा प्रयत्नात आहे. या कारणास्तव त्यांनी नियंत्रण रेषेवरील लष्करी जमवाजमव वाढवण्यासाठी पाकिस्तानला प्रोत्साहन दिले आहे. तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील मोठा षडयंत्र रचण्याचा प्रयत्नदेखील करू शकेल.
News English Summary: The Indian Air Force is on high alert at the LAC in Ladakh following the June 15 violence in the Galwan Valley in eastern Ladakh. Prime Minister Narendra Modi went to the forward base and blew the trumpet against China. Also, various aircraft of the Indian Air Force are deployed at the border.
News English Title: Pakistan increases activities PoK additional battalions deployed News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH