18 April 2025 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

आम्हाला मोदींचे दोन चेहरे पाहायला मिळणार, एक निवडणुकीपूर्वीचा व एक निवडणुकीनंतरचा

Loksabha Election 2019, Narendra Modi, Pakistan

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पुन्हा चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने भारतातील काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी मत व्यक्त केलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

इम्रान खान यांनी पाकिस्तानला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआऱपीएफचे चाळीस जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावंर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचं मिग-२१ हे लढाऊ विमान पाडलं होतं. यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती.

या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं की, ‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही’. यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने डझनहून जास्त दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी विचारलं असता, तो खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही आहे असं त्यांनी सांगितलं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या