18 January 2025 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

VIDEO | मोदींचा अमेरिका दौरा | मोदींच्या स्वागतासाठी 'मॅनेज' लोकं जमवली | अमेरिकेत ऑन कॅमेरा पोलखोल झाली

PM Modi tour of America

वॉशिंग्टन, २४ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी काल अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भेट घेतली. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. जो बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांची ही समोरासमोरची पहिलीच भेट असणार आहे.

VIDEO, मोदींचा अमेरिका दौरा, मोदींच्या स्वागतासाठी ‘मॅनेज’ लोकं जमवली, अमेरिकेत ऑन कॅमेरा पोलखोल झाली – PM Modi tour of America managed peoples gathered to welcome PM Modi exposed on camera :

विशेष म्हणजे दोन्ही देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे, वेगाने लसीकरण हे एक आव्हान आहे. सध्या दोन्ही देशांपुढे समान आव्हान आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. अफगाणिस्तान वादावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेले असले, तरी तुम्ही मोदी यांचे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास या भेटीचे राजनैतिक महत्त्व खूप जास्त आहे हे लक्षात येईल. मात्र या महत्वाच्या दौऱ्यात मोदींच्यासोबत आहेत भारतातील मोदी समर्थक मीडियातील प्रतिनिधी जे अमेरिकेच्या राजधानीत मोदी हवा असल्याचा खोटा प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतंय.

याच प्रसार माध्यमांनी वॉशिंग्टनमध्ये लोकं कसे मोदींच्या स्वागतासाठी आतुर आहेत याची हवा निर्माण करण्यासाठी उपस्थित भारतीय लोकांचा बाईट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच उपस्थित भारतीय लोकांच्या तोंडून जे सत्य समोर आलं त्याने याप्रकरणाची पोलखोल झाली असं म्हणावं लागेल. यामध्ये संबंधित लोकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आम्ही एवढयासाठीच येथे आलो आहोत, कारण आम्हाला येथे बोलावलं गेलंय, त्यासाठीच आम्ही आलो आहोत आणि आम्हाला सपोर्ट करा असं सांगितलं गेलंय’ अशी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देताच अंजना ओम कश्यप यांनी कॅमेरा दुसरीकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय.

त्यानंतर पुढं अमेरिकन माध्यमांचे मथळे मोदींच्या दौऱ्यामुळे भरून गेले असतील असं वाटल्याने अंजना ओम कश्यप यांनी अमेरिकेतील वर्तमानपत्र ऑन कॅमेरा चालण्यास सुरुवात केली. परंतु त्यात मोदी संबंधित मथळे न दिसल्याने त्या स्वतःच ऑन कॅमेरा तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ट्विटरवर इतर पत्रकार गोदी मीडियाची खिल्ली उडवत असल्याचं देखील पाहायला मिळतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: PM Modi tour of America managed peoples gathered to welcome PM Modi exposed on camera.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x