9 January 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, मल्टिबॅगर शेअर अजून किती घसरणार - NSE: SUZLON IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA
x

मोदी प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे नेते, खोटी माहिती पसरवतात | मोदींना थेट हुकूमशाहांच्या पंगतीत स्थान

Modi Predators Of Press Freedom

वॉशिंग्टन, ०७ जुलै | भारतासाठी अत्यंत चिंताजनक आणि लज्यास्पद वृत्त जगभर पसरल्याने समाज माध्यमांवर मोदींविरोधात रोष व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे भारतात जो आरोप काही काळापासून केला जातं आहे त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अधोरेखित होण्यास सुरुवात झाली आहे.

कारण जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) या संस्थेने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केलाय. धक्कादायक म्हणजे जगभरामध्ये आपल्या हुकुशाही वागणुकीसाठी ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यासारख्या नेत्यांच्या यादीत मोदींचाही समावेश करण्यात आलाय.

प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जगभरातील ३७ मोठ्या नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये इराणचे अली खामेनी, सिरीयाचे बशर अल असद, म्यानमार लष्कराचे जनरल मीनन आऊंग हिलींग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचाही समावेश आहे.

काही नेत्यांच्या पत्रकारांच्या हत्येतही सहभाग:
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी या सर्व नेत्यांनी सेन्सॉरशीप, पत्रकारांना थेट तुरुंगात डांबणे किंवा त्यांच्याविरोधात हिंसा घडवून आणण्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत. तसेच काही नेत्यांचा तर पत्रकारांच्या हात्या घडवून आणण्यामध्येही सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप आसएसएफने केलाय.

मोदींबद्दल काय म्हटलं आहे?
मोदींचा उल्लेख प्रिडेटर सिन्स टेकिंग ऑफिस म्हणजेच सत्तेत आल्यापासून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे नेते असा करण्यात आलाय. तसेच या अहवालाच्या सुरुवातील देण्यात आलेल्या प्रस्तावनेमध्ये प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यासंदर्भातील जागतिक यादीमध्ये भारताचा क्रमांक २०२१ साली १८० पैकी १४२ वा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आरएसएफच्या या यादीवर मंगळवार रात्रीपर्यंत भारत सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

खोटी माहिती पसरवतात मोदी
आरएसएफने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकप्रियता आणि खोट्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करतात असं म्हटलं आहे. मोदी हे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या इकोसिस्टीमच्या मदतीने त्यांना विरोध करणाऱ्या प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करतात असंही यात म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi In Reporters Sans Frontiers Predators Of Press Freedom List news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x