18 January 2025 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम: जगात २०२४ पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल: नरेंद्र मोदी

Russia, India, S400, Russia Far East, 1 Billion Dollar Credit

व्लादिवस्तोक : जगात भारताला आर्थिक महाशक्ती बनविण्याच्या संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व्लादिवस्तोक येथील आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,’ भारत, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास… यासोबत पुढे जात आहे. 2024 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पुढे जात आहे.’

मोदी म्हणाले, “मी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारत-रशिया सहकार्यासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, हे संबंध केवळ राजकीय पातळीवर न राहता उद्योग क्षेत्रातील सहकाऱ्यापर्यंत नेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आम्ही ‘सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्राद्वारे नवभारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहोत. २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रिलिअन इकॉनॉमी बनवण्याच्या अभियानातही आम्ही स्वतःला वाहून घेतले आहे.”

“भारत आणि फार ईस्टचे नाते हे आजचे नाही, खूप जुने आहे. भारत हा पहिला देश आहे ज्याने व्लादिवस्तोकमध्ये आपले वाणिज्य दुतावास स्थापन केले. त्यावेळी आणि त्यापूर्वीही भारत आणि रशियामध्ये अधिक विश्वास होता. सोवितय रशियाच्यावेळी देखील जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता. संरक्षण आणि विकासासंबंधीचे मोठ्या प्रमाणावर सामान व्लादिवस्तोकच्या माध्यमातून भारतात पोहोचत होते. याच भागीदारीचा वृक्ष आजही आपली मुळे घट्ट करीत आहे.”, असेही मोदींनी म्हटले आहे.

संरक्षण क्षेत्रात रशिया गेली पन्नास वर्षे भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे, असे गौरवोद्गार पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काढले. पुढील वर्षीच्या व्हिक्टरी डे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मॉस्कोला भेट देण्याचे निमंत्रणही पुतीन यांनी मोदींना दिले. भारताने रशियाकडे १४.५ अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी रशियाची एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने भारतावर मोठा दबाव आणला होता. तरीही तो व्यवहार पार पडला. तसेच, काही छोट्या युद्धनौका (फ्रिगेट), दारूगोळा, तसेच इग्ला-एस ही चल हवाई यंत्रणा भारत रशियाकडून खरेदी करणार आहे, अशी माहिती रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल को ऑपरेशनचे प्रमुख दिमित्री शुग्यायेव्ह यांनी दिली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x