23 February 2025 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अमेरिकेचा चीनवर कोरोनासंबंधित डेटा चोरीचा आरोप; ट्रम्प चीनविरुद्ध आक्रमक

US secretary Mike Pompeo, Covid 19 Related Research, Donald Trump

वॉशिंग्टन, १५ मे: अमेरिकेने चीन विरूद्ध सर्वात मोठ असं आक्रमक रुप धारण केलं आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला चीनलाच जबाबदार धरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोना पसरल्यामुळे चीनशी सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये ८०,००० अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.

ट्रम्पने फॉक्स बिझनेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, ‘अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आम्ही सर्व संबंध तोडू शकतो.’ गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती चीनच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत. खासदार आणि तज्ज्ञांची असं म्हणणं आहे की, चीनच्या निष्क्रियतेमुळे वुहानमधील कोरोना जगभर पसरला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनवर गंभीर आरोप केला आहे. तसेच कोरोना व्हायरस पसरण्यामागचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे. कोरोना व्हायरसवरील संशोधनातील डेटा चोरत असल्याचा आरोप करत पॉम्पिओ यांनी चीनवर निशाणा साधला आहे. ‘चीनशी संबंधित असलेल्या सायबर हॅकर्सने केलेल्या प्रयत्नांचा अमेरिका निषेध करते आणि अशा कारवाया थांबवल्या पाहिजेत असं आम्ही आवाहन करतो’ असं पोम्पिओ यांनी म्हटलं आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ८० हजार बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर प्रादुर्भाव झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत १४ लाखांच्या जवळपास लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या २४ तासात १ हजार ७५४ लोकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. यानंतर अमेरिकेतील मृतांची संख्या ८५ हजार ८१३ वर पोहोचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

 

News English Summary: US Secretary of State Mike Pompeo has made serious allegations against China. It also explains the exact cause of the spread of the corona virus. Pompeo has targeted China, accusing it of stealing research data on the corona virus.

News English Title: Prc Affiliated Actors Are Trying To Steal Covid Related Research From The United States secretary Mike Pompeo News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x