16 January 2025 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या
x

हुवेई कंपनी विरोधात? सायबर हल्ल्याची भीतीने ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी

Donald trump

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे तडकाफडकी पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरने शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.

व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या अधिकृत आदेशात कोणत्याही कंपनीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. परंतु हुवेई कंपनीला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. अमेरिकेत आणीबाणी लागू होताच हुवेईनं प्रतिक्रिया दिली. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांचं आणि नागरिकांचं मोठं नुकसान होईल, असं हुवेईनं म्हटलं. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी आणि हेरगिरीसाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या कंपन्यांनी यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केली होती.

हुवेईचं अमेरिकेतलं अस्तित्व कमी करण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. वाणिज्य मंत्रालयानं हुवेईचा समावेश ‘एन्टीटी यादी’त केला. यामुळे अमेरिकन कंपन्यांमधलं तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी स्फोटक होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये आधीच व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x