26 December 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

रशियाने विकसित केलेलं 'एव्हिफेव्हीर' औषध कोरोनावर प्रभावी ठरतंय...सविस्तर

Russia, approved Avifavir drug, treat Covid 19

मॉस्को, २ जून: संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या संकटाने आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. या धोकादायक आजारावर मात करण्यासाठी सर्वच राष्ट्र प्रभावी औषधाच्या शोधात आहे. रशियाने या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही नवी लस लवकरच रुग्णांच्या उपाचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य यंत्रणेने दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रशिया सकरकार ही लस वापरण्यास मंजुरी दिली आहे.

रशियाने विकसित केलेल्या या लसीला ‘एव्हिफेव्हीर’ असं नाव देण्यात आलं आहे, तर ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल लसीने उपचार सुरु होणार आहेत. ही लस विकसित करणारी कंपनी दर महिन्याला तब्बल ६० हजार रूग्णांवर उपचार करेल अशाप्रमाणात लसीचं उत्पादन करणार आहे.

‘एव्हिफेव्हीर’ हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. एका जापानी कंपनीने या लसीची निर्मिती १०९० साली केली होती. जपानमध्ये ही लस ताप, सर्दी झालेल्या रुग्णांना देण्यात येते. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एव्हिगन या ब्रॅण्डनेमअंतर्गत फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते.

‘एव्हिफेव्हीर’ लसीवर काही प्रक्रिया करून शिवाय त्यामधील रोगप्रतिकाशक्ती वाढवण्याचा प्रयत्न रशियन शास्त्रज्ञांनी केले आहे. रशियाकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची माहिती काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात यईल असं वक्तव्य आरडीआयएफच्या प्रमुखांनी केलं आहे. शिवाय त्यांनी अवघ्या चार दिवसांत रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक संशोधन करत आहे. यात कोरोना व्हायरस लशीबद्दल एक चांगली बातमी आहे. इबोला निर्मूलनासाठी बनवलेले एक औषध कोरोना विषाणूच्या रूग्णांना बरे करत असल्याचं आढळून आलं आहे. जीलीड्स सांइसेज इनकॉर्पोरेशनच्या रेमडेसिविर औषधाने कोरोनाचे गंभीर रुग्ण वगळता इतर रुग्ण बरे होत आहेत.

कोरोनाच्या रूग्णांवर औषध तपासण्यासाठी कंपनीने ६०० रूग्णांवर दोन प्रकारचे उपचार केले. काही लोकांना औषध ५ दिवस दिले गेले. काही रुग्णांना १० दिवसांचा औषधोपचार देण्यात आला. त्या रुग्णांबरोबरच मानक औषधी प्रक्रियेद्वारे उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही ठेवले होते.

अकराव्या दिवशी असं आढळून आले की, पाच दिवसांचे उपचार असलेले रूग्ण सामान्य पद्धतीने उपचार घेणाऱ्या रूग्णांपेक्षा तुलनेने लवकर बरे होत आहेत. तसेच, ज्या गंभीर रुग्णांना १० दिवस औषध दिले गेले होते त्यांच्यातही बरीच सुधारणा दिसली आहे. अगदी महिनाभरापूर्वीच, अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, या औषधाच्या यशामुळे आम्हाला कोरोनाचा पराभव करण्याची नवी आशा मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ एँथोनी फॉसी यांनीही या औषधाचे कौतुक केले आहे.

 

News English Summary: Ravaged by COVID-19, Russia plans major push this month for Avifavir, a fast-tracked antiviral treatment News latest updates.

News English Title: Russia approved Avifavir drug to treat Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x