14 January 2025 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

अधिकृत जागतिक घोषणा | जगातील पहिली कोरोना लस रशियाने बनवली

Russia, first Coronavirus vaccine, Putin

मॉस्को, ११ ऑगस्ट : रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकचं नाही तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे. माहितीनुसार ही लस मॉस्कोच्या गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केलं आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचं काम सुरु करेल आणि मोठ्या संख्येने लसीचे डोस तयार करण्यावर त्यांचा भर असेल.

अलीकडेच व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीला नवीन लस देण्यात आली. काही वेळानंतर तिच्या शरीराचं तापमान वाढलं पण आता ती पूर्णपणे बरी झाली आहे असं राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. याबाबत एएफपी न्यूज एजेन्सीने ट्विट करुन माहिती दिली आहे.

दुसरीकडे भारतातीही शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करत आहे. दरम्यान, भारतातील करोना लसीची चाचणी सुरू असून यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले. सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.

 

News English Summary: Amid the race to develop a Covid-19 vaccine, Russian President Vladimir Putin launched a coronavirus vaccine, touted as the world’s first such vaccine, too. The registration of the vaccine lays ground for mass inoculation even as the final stages of clinical trials to test safety and efficacy continue.

News English Title: Russia has developed first Coronavirus vaccine said Putin News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x