22 December 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी रशियाआणि ऑस्ट्रेलियाचा भारताला पाठिंबा

Russia, permanent membership, United Nations Security Council, UNSC

नवी दिल्ली, २३ जून : चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषद (यूएनएससी) मध्ये कायम सदस्यत्व देण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यतेसाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने यापूर्वीच सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला होता. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. दोघांच्या सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले, आज आम्ही संयुक्त राष्ट्राच्या संभाव्य सुधारणांवर चर्चा केली. तसेच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचे समर्थन करतो. आमचा विश्वास आहे, की भारत सुरक्षा परिषदेचा पूर्ण सदस्य बनू शकतो.

जेव्हा देशाचा मुद्दा येतो, तेव्हा भारत आणि चीनला बाहेरून काही मदतीची आश्यकता आहे, असे मला वाटत नाही. कारण, ते स्वतःच्या बळावर समस्या सोडवण्यास समर्थ आहेत. असे लावरोव म्हणाले. ते आरआयसीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत बोलत होते.

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या कायमस्वरुपी सदस्यत्वाच्या भारताच्या दाव्याला पुन्हा पाठिंबा दर्शविला. ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फैरेल म्हणाले की, “आम्ही युएन सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाचे समर्थन केले आहे.” ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या कार्यकारी अध्यक्षाच्या रुपात भारताच्या स्थितीला महत्त्वपर्ण आणि सकारात्मकपणे पाहतो.’

 

News English Summary: Russia has once again expressed its support for India’s permanent membership in the United Nations Security Council (UNSC) in the wake of tensions on the border with China. Russia has backed India’s candidacy for permanent membership of the Security Council.

News English Title: Russia has once again expressed its support for India’s permanent membership in the United Nations Security Council News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UNSC(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x