18 November 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

भारत-चीन वादात रशियाची मध्यस्ती | पुतीन यांची आशिया खंडासाठी वेगळी योजना

India China, Russia, Vladimir Putin, Marathi News ABP Maza

मॉस्को, १९ सप्टेंबर : भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या वादात रशियाने केलेल्या मध्यस्थीमुळे अनेक देश हैराण झाले आहेत. या वादात अमेरिकेपेक्षा रशियाने अधिक सक्रीय भूमिका बजावली. मॉस्कोत झालेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत-चीन दरम्यान बैठक पार पडली. भारत-चीनला एक व्यासपीठ दिले असून याद्वारे सीमा प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो, असेही रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले.

भारत आणि चीनमध्ये शांततेसाठी रशियाचे प्रयत्न:
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, मॉस्कोमध्ये भारत-चीन दरम्यान तणाव कमी करण्यासाठी काही निर्णय झाले आहेत. मात्र, हे निर्णय प्रत्यक्षात किती काळ टिकेल याबद्दल तज्ञांना अजूनही शंका आहे. तर दोन्ही देशांचे हजारो सैनिक उभे ठाकले आहेत. मात्र, या वादाच्या माध्यमातून, रशिया पुन्हा एकदा जागतिक पातळीवर दोन देशांतील वाद सोडविण्यासाठी सक्षम असणारा देश अशी आपली प्रतिमा बनवत आहे. त्यासाठीच रशियाचे हे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे 2000 साली सत्तेवर आले. त्यांनी रशियाच्या कमकुवत स्थितीवर अनेकदा दुःखही व्यक्त केले होते. मात्र, आता रशिया त्यांच्याच नेत्रृत्वात आशिया आणि अफ्रिकेतील गमावलेला प्रभाव पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पुतीन प्रचंड परिश्रम घेत आहेत. नव्हे, भारत आणि चीन यांच्यात शांतता प्रस्थापित केल्यास आशियात पुन्हा शक्तीशाली होण्याचा मार्ग त्यांना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी रशियाने अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 11 देशांची बैठक घेतली होती. ही चर्चा यशस्वी झाली होती. यामुळे रशियाला बळ मिळाले होते. या बैठकीत भारताचाही समावेश होता.

 

News English Summary: Russia’s mediation in the ongoing dispute between India and China has troubled many countries. Russia played a more active role in the dispute than the United States. The India-China meeting was held at the SCO summit in Moscow. Russia’s foreign minister also said that India and China have been given a platform through which border issues can be resolved through talks.

News English Title: Russia involved in the china India border dispute know about Vladimir Putin main aim Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x