18 January 2025 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

अफगाणच्या क्रूर तालिबानी राजवटीला भारताचा परम मित्र रशियाचाही पाठिंबा | भारत कात्रीत सापडला?

Taliban in Afghanistan

काबुल, १७ ऑगस्ट | अपेक्षेप्रमाणे तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला आहे. साधारण १५ ते २० दिवसांच्या आतच अफगाणी सैन्याचा पाडाव झाला. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी लाखो अफगाणी नागरिकांना शब्दश: वाऱ्यावर सोडून देशातून परागंदा झाले आहेत. आता मुल्ला अब्दुल गनी बरादर या तालिबानी प्रमुखालाच राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पॅलेस ताब्यात घेतल्यावर तालिबान्यांनी तिथे जंगी ‘दावत’ केली. ही दावत यादवी आणि तालिबानच्या माथेफिरू राजवटीच्या या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे. २० वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीची दहशत, धुमाकूळ अनेकांच्या स्मरणात असेल. अगदी तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे.

फरक एवढाच की, अमेरिका-रशियाचे यापूर्वीच हात पोळले आहेत. त्यामुळे या वेळी अमेरिकेेऐवजी चीन केंद्रस्थानी आला आहे. १९९६ च्या तालिबानी राजवटीला पाकिस्तानसह केवळ तीन देशांनी मान्यता दिली होती. आता तालिबान्यांनी सत्तास्थापनेची घोषणा करताच चीनने मैत्रीचा हात पुढे केला आहे. सुमारे दहा लाख अफगाणी नागरिकांनी आश्रयासाठी पाकिस्तानकडे धाव घेतली आहे. अनेकांनी इराणमार्गे तुर्कीकडे पलायन केले आहे. निर्वासितांचे हे लोंढे भारताकडेही येऊ शकतात. तालिबानप्रमुख बरादर याने अफगाणिस्तानात शांतता असेल असे सांगितले आहे. अर्थात, पुन्हा अंधारवाटेवर निघालेल्या अफगाणिस्तानसाठी ही शांततासुद्धा भयाण ठरू शकते.

दरम्यान, पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. धक्कादायक म्हणजे आता रशियानेही तालिबानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांकडून तालिबानवर टीका होत असताना रशिकाकडून तालिबानला उघडपणे पाठिंबा मिळताना दिसत आहे. रशियाचे अफगाणिस्तानमधील राजदूत दिमित्री जिरनोव्ह यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील याआधीच्या सरकारच्या तुलनेत तालिबाबने पहिल्या २४ तासांमध्ये काबुल अधिक सुरक्षित बनवले आहे. (Russia support Taliban ruling in Afghanistan news updates)

तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे. विमानतळावर तालिबानला कब्जा करता आला नसून ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपला दूतावासच  विमानतळावर हलविला आहे. तालिबानी तिथे हल्ले करतील या शक्यतेने तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक तैनात आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Russia support Taliban ruling in Afghanistan news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x