16 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

व्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार

Russian Voters Agree, Putin

मॉस्को, २ जुलै : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, आठवडाभर सुरू असलेली जनमत चाचणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे पुढील १६ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मतदानात सुमारे ९८ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 2036पर्यंत पदावर ठेवण्यासाठी रशियाची जनतेने पाठिंबा व विरोध दर्शविला. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या ६७ वर्षीय अध्यक्ष पुतिन यांचा कार्यकाळ वर्ष 2024मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीला ७८ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर २१ टक्के लोकांनी त्याच्याविरोधात मतदान केलं आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचं केबीसी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे पुतिन यांना पुन्हा सहा-सहा वर्षांसाठी सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ६७ वर्षांचे आहेत, त्यांना आता वय वर्ष ८३ असेपर्यंत रशियाच्या अध्यक्षपदावर राहता येणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.

२००० मध्ये पुतीन हे सत्तेत आले होते. तसंच एका खासगी सर्वेक्षण संस्था लेवाडानुसार पुतीन यांची आताबही लोकप्रियता ६० टक्के इतकी आहे. तर दुसरीकडे पुतीन यांच्यावर काही आरोपही करण्यात आले होते. ऑनलाइन मतदान प्रक्रिया घटनात्मक निकष पूर्ण करत नाही असा आरोप निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या गोलोस या समुहानं केला आहे. मतदानासाठी दबाव, मतपत्रिकांमध्ये गडबड, अधिकारांचा गैरवापर आणि बेकायदेशीर प्रसिद्धी अशीही प्रकरणे समोर आली असल्याचं म्हटलं जात आहे.

 

News English Summary: Russian President Vladimir Putin will remain in office until 2036. Russian voters have approved changes to the constitution to keep Putin in office.

News English Title: Russian Voters Agree To Let Putin Seek 2 More Terms Constitution Change News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Russia(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या