22 February 2025 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

राफेल लढाऊ विमान खरेदीत बोगस व्यवहार | भारतातील दलालांना करोडोचे गिफ्ट - फ्रेंच मीडिया

French Rafale jet fighters, French media, report scam, Modi Govt

पॅरिस, ५ एप्रिल: राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

AFA ने केलेल्या चौकशीत देसॉ एव्हिएशनने सांगितले, की त्यांनी राफेल विमानाचे 50 मॉडेल एका भारतीय कंपनीसाठी तयार केले होते. या मॉडेलसाठी 20 हजार यूरो (17 लाख रुपये) प्रत्येकी पैसे घेण्यात आले आहेत. पण, हे मॉडेल कुठे आणि कशा पद्धतीने वापरण्यात आले याचे काहीच पुरावे नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, मॉडेल बनवण्याचे काम कथितरित्या भारतीय कंपनी Defsys Solutions ला देण्यात आले होते. ही कंपनी सध्या भारतात सब-कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे. या कंपनीचे मालक असलेले सुषेण गुप्ता संरक्षण करारांमध्ये मध्यस्थ आणि देसॉ एव्हिएशन करारात एजंट आहेत. सुषेण गुप्ता यांना 2019 मध्ये ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात ईडीने अटकही केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, सुषेण गुप्तानेच मार्च 2017 मध्ये देसॉ एव्हिएशनला राफेल मॉडेल बनवण्यासाठी बिल दिले होते.

फ्रांसच्या न्यूज वेबसाइटने केलेल्या दाव्यानंतर भारतात राफेल विमानांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला होता. त्यात आता 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना राफेल पुन्हा चर्चेत आले. अशात काँग्रेसकडे केंद्रातील भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सी AFA नं दसॉच्या खात्यांचं ऑडिट केलं. त्यावेळी ही बाब समोर आली. मीडियापार्टच्या रिपोर्टनुसार हा खुलासा झाल्यानंतर दसॉनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. तसंच या पैशांचा वापर राफेल लढाऊ विमानाचे ५० मोठे मॉडेल तयार करण्यासाठी झाला होता. परंतु अशी कोणती मॉडेल तयारच झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. ऑडिटमध्ये ही बाब समोर आल्यानंतरही एजन्सीनं कोणतीही कारवाई केली नाही. हे फ्रान्समधील न्यायिक प्रक्रिया आणि राजकारणी एकत्र असल्याचं दाखवून देत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फ्रान्समध्ये २०१८ साली एक एजन्सी Parquet National Financier’नं या डीलमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हे ऑडिट करवण्यात आलं. त्या ऑडिटनंतर ही बाब समोर आली होती.

 

News English Summary: The Raphael fighter jet scandal has once again come under worldwide discussion due to the French media. A French website claims that bogus deals were made by Deso Aviation. The media reported that the French anti-corruption body AFA was certified. The company’s 2017 accounts were audited. Accordingly, 5 lakh 8 thousand 925 Euros or about 4.39 crore rupees have been spent in the name of client gifts. It is unknown at this time what he will do after leaving the post. Only one March 2017 bill from the aircraft modeling company has been made available.

News English Title: Sale of French Rafale jet fighters to India French media report scam with new evidences news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x