भारतात इटलीसारखी स्थिती निर्माण होणार, अमेरिकन वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांचा दावा

न्यूयॉर्क, १३ जून : कोरोनाच्या संसर्गावर देखरेख ठेवणाऱ्या अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील वैज्ञानिक स्टीव्ह हॅक यांनी भारताला सडलेले सफरचंद संबोधले आहे. भारत करत असलेल्या कोरोनाच्या उपाययोजनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .प्रा .स्टीव्ह हॅक यांनी भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर देखील टीका केली आहे.
हे देश कोरोनाशी संबंधित आकडेवारीची माहिती देत नाहीत. तसेच संशयित आकडेवारी देत आहेत. प्रा. हॅक यांनी याबाबीत आपल्या ट्विटमध्ये विद्यापीठातील आकडेवारीचा ग्राफच दिला आहे. भारतात फारच कमी प्रमाणात कोरोनाची चाचणी होत असून इथे इटलीसारखी परिस्थिती उदभवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी देखील त्यांनी भारत करत असलेल्या कोरोनाविरोधातील उपाययोजना बाबत टीका केली होती.
दरम्यान, जगातले १९० देश या व्हायरसमुळे ग्रासले आहेत. काही देशांनी व्हायरसवर नियंत्रण मिळवलेलं असलं तरी त्याचा धोका टळलेला नाही. जगात या व्हायरसमुळे तब्बल १० कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती जगप्रसिद्ध Lancet मासिकात आलेल्या एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. Active case finding with case management: The key to tackling the COVID-19 pandemic असं लांबलचक शिर्षक या लेखाचं असून चीनचे तत्ज्ञ डॉक्टर गाओ फू यांच्या नेतृत्वाखाली हा लेख तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिला आहे.
१९१८ मध्ये आलेल्या महामारीत जगात कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता. त्यापेक्षाही कोरोनाची साथ भयानक असल्याचं त्यात म्हटलं आहे. इतर साथीच्या आजारांपेक्षा कोरोनाचा आजार भयंकर आहे. त्याच बरोबर त्याचा मृत्यूदरही जास्त असल्याचं निरिक्षण यात नोंदविण्यात आलं आहे.
News English Summary: Steve Hack, a scientist at Johns Hopkins University in the United States who monitors coronary infections, has called India a rotten apple. He has expressed his displeasure over the corona measures being taken by India.
News English Title: Steve Hack a scientist at Johns Hopkins University in the United States who monitors coronary infections has called India a rotten apple News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA