अन्यथा 'त्या' डेटा'नुसार इंग्लंडमध्ये ५ लाख तर अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी होतील - संशोधन
लंडन, १८ मार्च: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे युरोपमधील देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एका संशोधनातील निष्कर्षांवरून इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे या दोन्ही देशाचे सर्वाधिक किती नुकसान होऊ शकते, याचा एक अंदाज या संशोधनात वर्तविण्यात आला आहे. या संशोधनानुसार, जर कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण अमेरिकेत झाले तर तिथे २२ लाख लोक मृत्युमुखी पडतील. तेच जर इंग्लंडमध्ये झाले तर तिथे पाच लाख लोकांचा यामुळे बळी जाईल.
ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानंतर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जोहान्सन यांनी करोनाचा मुकाबला करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय विविध आजार असलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्याचे आदेश दिले आहे. लंडन येथील प्राध्यापक नील फर्ग्युसन यांनी इटलीतील परिस्थितीच्या आधारे हे संशोधन केले आहे.
या निष्कर्षांनंतर इंग्लंडमधील सरकारने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द केले. आपल्या देशामध्ये जे ७० पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही स्थितीत सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. आपल्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
News English Summery: Countries in Europe and the United States are currently worried because of the corona virus infection. In the meantime, the findings of a research have added to the concerns of both England and the United States. The study estimates the extent to which the two countries are most affected by the Corona virus infection. According to this research, if a large number of corona virus infections occur in the United States, 22 million people will die there. If that were to happen in England, there would be five million victims. The research was conducted by the group led by Neil Ferguson, professor of mathematical biology at Imperial College London. In the last few days, a large number of people lost their lives due to the infection in Italy. These findings are made by studying the data there.
News English Title: Story 22 Lakh Corona Virus deaths in USA 5 Lakh in United Kingdom predicts British study.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER