21 November 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना थैमानामुळे ट्रम्प यांचे जनरल इलेक्ट्रिकला व्हेंटिलेटर बनविण्याचे सक्तीचे आदेश

Corona Crisis, Covid 19, America General Electric, ventilators

वॉशिंग्टन डीसी, २९ मार्च : युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.

जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता आहे. कोरोनाने शहरात थैमान घातलं असून दर १७ व्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. सगळी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरून गेली आहेत. नवे पेशंट्स दाखल करून घ्यायला आता बेड्सही शिल्लक राहिले नाहीत. परिस्थिती अशीच राहीली तर हे शहर उद्धवस्त होईल अशी भीती न्यूयॉर्कच्या महापौरांनी व्यक्त केलीय.

 

News English Summary: Three million people have been infected in Europe and there is no sign of the Corona virus. In the United States, which currently has 1 million 4,000 patients, President Trump on Friday used wartime powers to force private companies to manufacture medical devices. The GE (General Electric) company has been forced to produce a ventilator. Trump has expressed optimism that these decisions will improve the situation in the future. Sixty percent of the total area in the United States has closed all transactions.

 

News English Title: Story After Corona crisis in America US President Donald Trump order General Electric to start manufacturing of ventilators Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x