घाबरू नका! चीन'मधील हंता विषाणू'बाबत भीती घालवणाऱ्या आमच्या वृत्ताला दुजोरा...
बीजिंग, २५ मार्च: एकाबाजूला कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला असताना चीनमधून अजून एका नव्या व्हायरसची बातमी आल्याने लोकं पुन्हा दबावाखाली जाऊ शकतात, पण तशी धास्ती घेण्याचं अजिबात कारण नाही. यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं होतं.
वास्तविक कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, अशी खात्री केल्यानंतर आम्ही वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र आता चीन सरकारच्या मालकीचं असलेल्या ग्लोबल टाईम्सने याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रनामा न्यूजने लोकांची भीती घालवण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताला दुजोरा मिळला आहे. हंता व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याचं ग्लोबल टाईम्सने मान्य केलंय. मात्र कोरोनासारखा हा व्हायरस श्वसनावाटे पसरणारा नाही. किंवा त्याची झपाट्याने लागणही होत नाही. हंता व्हायरस पेशंटच्या रक्त आणि लाळेच्या संपर्कात कुणी आलं असेल तरच त्याला त्याची बाधा होऊ शकते असं स्पष्टीकरण ग्लोबल टाईम्सने दिलं आहे. चीनच्या युन्नान प्रांतात हा व्हायरस आढळून आला आहे. उंदरांमध्ये हा व्हायरस सापडतो. त्याची लागण झाल्यावर ताप येणं, डोकं दुखणं, अंग दुखणं, उलटी, जुलाब होणं अशी लक्षणं दिसून येतात.
Unlike #COVID19, #hantavirus is not mainly transmitted via respiratory system. But human excreta and blood of an infected #hantavirus patient can be contagious, virologist said after a Chinese worker died of the hantavirus. https://t.co/ozqjVWrylg pic.twitter.com/A7x4036nG1
— Global Times (@globaltimesnews) March 25, 2020
काल यावर काय सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं;
वास्तविक बांबू रॅट म्हणजेच चीनमध्ये आढळणारी एकप्रकारची उंदराची प्रजाती. या उंदरांचं मांस विकून चीनमधील दुर्गम भागात राहणारे अत्यंत गरीब शेतकरी आपलं पोट भरत होते. या बांबू रॅटमुळे त्यांना चांगला नफा मिळत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती हळहळू सुधारत होती, मात्र कोरोना विषाणुच्या फैलावामुळे या गरीब शेतकऱ्यांचंही जगणं अवघड झालं आहे.
अनेक स्थानिक सरकारनं या गरीब शेतकऱ्यांना बांबू रॅट पालनासाठी मदत केली होती. आपल्याइथे कुक्कुटपालन किंवा मत्सपालन आहे, तसेच तिथे या व्यवसायासाठी स्थानिक सरकारनं शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवलं होतं. मात्र आता बिजिंगमध्ये कोरोना विषाणूमुळे जंगली प्राण्यांचं मांस विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.
चीनमध्ये ‘बांबू रॅट’ मटणाचा १०५ अब्जांचा उद्योग, ते खातात म्हणून हंता विषाणूचा त्यांना धोका ….भारतीयांनी उगाच भीती बाळगू नये.#Hantavirus pic.twitter.com/VhU19VBf9Q
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 24, 2020
चीनच्या डोंगरावर राहणारे आणि हे उंदीर पाळणारे अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्याजवळ हे उंदीर पाळून त्यांचे मासं विकण्यापलीकडे अर्थाजनाचा दुसरा मार्ग नाही, त्यातले अनेक लोक हे दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकदेखील आहेत, अशा परस्थितीत त्यांना इतर काम मिळणं हे शक्य नाही, अशी माहिती इथल्या एका उंदीर पाळणाऱ्या व्यक्तीनं स्थानिक प्रसार माध्यमांना दिली होती.
या वर्षांच्या अखेरपर्यंत ५० दशलक्ष लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढायचं असा चीनचा उद्देश होता, मात्र कोरोना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं पूर्ण गणितच बिघडलं आहे. केवळ बांबू रॅटच्या मटणावर बंदी घातल्यानं १०५ अब्जांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यावरुन हा व्यवसाय किती मोठा आहे याची कल्पना आपण करु शकतो. चीनच्या काही भागात तर गेल्या ३० वर्षांपासून उंदीर पाळून त्यांचे मांस विकले जात आहे. चीनच्या दक्षिण भागात उंदारांचं मांस मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. मात्र आता कोरोनामुळे चीनमध्ये त्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आसाम राज्यात म्हणजे भारत-भूतानच्या सीमेवर असलेल्या बकसा जिल्ह्यातील कुमारिकट्टा गावातील आदिवासी समाज अशा प्रकारे (खाली फोटो पहा) आठवडी बाजारात उंदीर विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मात्र आजपर्यंत असं उदाहरण भारतात समोर आलेलं नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या बाबतीत चीनमधून जी सुरुवात झाली, त्याला अनुसरून कोणतीही घटना अथवा मृत्यू थेट ब्रेकिंगन्यूज’चा सपाट लावू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि हंता व्हायरसच्या बाततीतील बातम्या त्यातीलच प्रकार समजावा.
News English Summery: The corona virus came from China and spread all over the world. The virus has infected more than 4 million and 25,000 people worldwide. As the world was fighting against Corona, everyone was wondering what the next virus would bring. However, the Global Times, owned by the Chinese government, has disclosed this. Global Times has confirmed that one died of the Hanta virus. However, like Corona, the virus does not spread to the respiratory tract. Nor is it immediately infected. Global Times explains that only if someone has come in contact with the blood and saliva of the Hanta virus patient can it be prevented. The virus has been detected in Yunnan Province, China. The virus is found in rats. Symptoms include fever, headache, limb pain, vomiting, laxatives after infection.
News English Title: Story another hanta virus outbreak in China one worker death global times clarification Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार