18 January 2025 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

भीषण! अमेरिकेत लॉकडाउनविरोधात बंदुका घेऊन आंदोलन

US Lockdown, Corona Crisis, Armed US protesters enter Michigan capital

वॉशिंग्टन, १ मे: कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित अमेरिका झाली असून आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अमेरिकेसाठी दिलासादाक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ५५ हजार जणांनी या महामारीचा पराभव केला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये लागू केलेली सुरक्षित वावरासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांची मुदत आज गुरुवारी संपत असून, ही मुदत वाढविणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांचे जावई व सल्लागार जेरेड कुश्नेर यांनी येत्या जुलै महिन्यापर्यंत अमेरिकेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होईल, असे म्हटले आहे.

अमेरिकेत एका बाजूला करोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे लॉकडाउन हटवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लॉकडाउनविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी बंदुका घेऊन आंदोलन केले. अमेरिकेतील मिशिगन राज्यात हे आंदोलन झाले. तर, अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने गुरुवारी दोन हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे.

लॉकडाउनच्या विरोधात याआधीदेखील निदर्शने झाली होती. गुरुवारी मात्र, मिशिगनमध्ये आंदोलकांनी बंदुका हातात घेऊन आंदोलन केले. आंदोलकांनी मिशिगन राज्याच्या प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत वादावादी झाली. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांनी बुलेटप्रूफ जॅकेटही घातले होते. आंदोलक हे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असल्याची चर्चा आहे.

 

News English Summary: There have been protests against the lockdown before. On Thursday, however, protesters in Michigan carried guns. The protesters tried to break into the Michigan state administration building. This time there was an argument with the police. The protesters also wore bulletproof jackets, according to AFP. The protesters are rumored to be supporters of the Republican Party.

News English Title: Story Armed US protesters enter Michigan capitol to demand lockdown end News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x