15 January 2025 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

किती मदत दिली तरी रडतात; न्यूयॉर्क'वर ट्रम्प संतापले; दाजींच्या विधानाची आठवण

Corona Crisis, New York, Covid19, Donald Trump

वॉशिंग्टन, ७ एप्रिल: कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसा सर्वाधिक फटका अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला बसला आहे. या ठिकाणी एका दिवसांत कोरोनाचे ४१०५ रुग्ण समोर आले आहेत. तर २१८ जणांचा बळी गेला आहे. या शहरामध्ये आतापर्यंत तब्बल ६४, ९५५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय २४७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतर वैद्यकीय साहित्य आणि औषधांच्या पुरवठ्यावरून ट्रम्प सरकारवर न्यूयॉर्क’मधून मोठी टीका होऊ लागली आहे. त्यात स्थानिक प्रसार माध्यमांनी देखील ट्रम्प सरकारला धारेवर धरल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जे उत्तर दिलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून जसं विधान केलं होतं तसंच साम्य असणार विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

न्यूयॉर्कला केलेल्या सरकारी पातळीवरील मदतीवरून ट्रम्प यांनी चांगलंच सुनावताना म्हटलं आहे की, अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मदत ही न्यूयॉर्कला देण्यात आलेली आहे, पण कुणास ठाऊक ते केवळ तक्रारीच करत आहेत’ असं ट्विट करत संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summary: Meanwhile, the Corona virus has hit New York City the most in the United States. 4105 Corona patients have been exposed to the place in one day. So far, 218 people have been killed. So far, 64,955 people have been infected with Corona in this city. Moreover, 2472 people have died. But since then, the Trump government has come under heavy criticism from New York over medical supplies and drug supplies. The answer given by President Trump is because local media has also taken the Trump government to the curb.

 

News English Title: Story Corona Crisis in America US President angry on New York over help on Covid19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x