15 January 2025 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ लाखांच्या पार

Corona Crisis, Corona Virus, America

न्यूयॉर्क, २८ मार्च : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.

दरम्यान, अमेरिकेतच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांवर उपचारांसाठी अमेरिकेत व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्याच्या उत्पादनांचा वेग वाढवण्यात आला आहे. ‘आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु’ असे ट्रम्प यांनी सांगितले.

तसेच अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी एक सोपी चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणीच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनिटांत या विषाणूची लागण झाली आहे की नाही समजते. त्याचबरोबर ही चाचणी करणारे उपकरणही हाताळण्यास एकदम सोप्पे आहे. ते कोणत्या रुग्णालयात, दवाखान्यामध्ये सहज ठेवता येऊ शकते. येत्या एक एप्रिलपासून रोज अशी ५० हजार उपकरणे उपलब्ध करून देण्याचे अबॉट लॅबोरेटरिजने म्हटले आहे.

 

News English Summary: The United States, which has a global superpower, appears to be in the throes of the Corona virus that is plaguing the world. Coronary arthritis in the United States reaches over one million. So far, 1544 people have died due to corona. According to data released by John Hapking University, about 18,000 people have been exposed to Corona in the United States in the past 24 hours. So far 345 people have died. Coronation figures in the United States are estimated to be 1 in 717. Meanwhile, the US has a large population of people infected with the Corona virus. Products for ventilators and other medical materials have been accelerated in the United States to treat these patients. “We will supply medical supplies to the Allies as well,” Trump said.

 

News English Title: Story Corona virus 1 lakh corona positive person 1544 death in America News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x