माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्यापेक्षा तो तरुण रुग्णांसाठी वापरा; अन त्या आजीने प्राण सोडले
बेल्जीयम, २ एप्रिल: बेल्जियममधील एका ९० वर्षीय करोनाग्रस्त महिलेने उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मत्यू झाला आहे. डॉक्टरांनी माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्याऐवजी तरुण रुग्णांसाठी तो ठेवावा असं सांगत या महिलेने उपचारांना नकार दिल्याचे फॉक्स न्यूजने म्हटलं आहे.
बेल्जीयम: माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्यापेक्षा तो तरुण रुग्णांसाठी वापरा; अन त्या आजीने प्राण सोडले
सौजन्य: फॉक्स न्यूज
खात्रीसाठी लिंक – https://t.co/xG5qkW09jy pic.twitter.com/GLOO7qnN66
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 2, 2020
लुबेक येथील बिनकोम शहरातील सुझॅन होलर्ट्स या महिलेला तिची मुलगी जुडीथ डॉक्टरांकडे घेऊन आली. सुझॅन यांना भूक लागत नव्हती तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. सुझॅन यांची करोना चाचणी घेण्यात आली ती पॉझिटीव्ह निघाली. करोना झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे सुझॅन यांना विलगीकरणात ठेवण्यात आला. त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं. “माझ्यासाठी कृत्रिम श्वसन यंत्रणा वापरु नका. जी यंत्रणा माझ्यासाठी वापरणार होते तिचा एखाद्या तरुण रुग्णासाठी त्याचा वापर करा. मी माझं आयुष्य छान जगले आहे,” असं सुझॅन यांनी डॉक्टरांना सांगितलं.
दरम्यान, जगभरात सध्या कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे.अशातच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढणार आहे. कोरोनाचा वाढता आकडा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनणार आहे. मागील ५ आठवड्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली असल्याचं त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसपुढे महास्ता म्हणवला जाणारा अमेरिकाही पुरता हतबल झाला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. या आकड्याने अमेरिकेवर 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. 2001मध्ये झालेल्या या हल्लात जवळपास ३ हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. येथील 190,000 हून अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत.
News English Summary: A 90-year-old coronary woman in Belgium has died after being refused treatment. Fox News reported that the woman refused treatment, saying doctors should keep the ventilator for me instead of using it for younger patients. Susan Hollerts, a woman from Bincomb, Lubeck, brought her daughter, Judith, to the doctor. Suzanne had no appetite as well as difficulty breathing. Susan was tested positive for Corona. Suzanne was kept in isolation after being proven to be Corona. They were not allowed to meet anyone. “Don’t use artificial respiration for me. Use the mechanism that was going to work for me for a young patient. I’ve lived my life well, “Suzanne told the doctor.
News English Title: Story corona virus Belgian woman 90 with Covid 19 dies after telling doctors to save ventilator for younger patients News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH