15 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

जग लॉकडाउनमुळे चिंतेत; तर चीनमध्ये 'फटा पोश्टर निकला हिरो'; चित्रपटगृह खचाखच

Corona Crisis, Corona Virus, China people watching blockbuster Movies

शांघाय, २७ मार्च: कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ हजार ४६१ लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये ६५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत. त्यानंतर स्पेन, फ्रांस आणि अमेरिकेत देखील भीषण परिस्थिती झाली आहे.

मात्र चीनमध्ये मागील २ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहेही सुरु करण्यात येत आहेत. चीनचे मुख्य शहर शांघायमध्ये २०० हून अधिक थिएटर्स उघडण्यात येत आहेत. चीनमधील अन्य भागातील ७०० थिएटर्स उघडण्यात आली असून तेथे ब्लॉकबस्टर सिनेमांच्या तिकिटावर मोठी सूट सरकरानेच देऊ केली आहे. या सर्व चित्रपटगृहांमध्ये जुने ब्लॉकबस्टर सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. शांघाय प्रशासनाने थिएटर उघडण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश करताना शरीराचे तापमान तपासावे लागणार आहे. तसेच दोन जागांमधील अंत देखील कमीतकमी १ मीटर ठेवायचे आहे.

तत्पूर्वी चीनमधील हुबेई शहरासहित संपूर्ण चीन आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रांतातील मोटार आणि त्यासाठी लागणाऱ्या छोट्या भागांच्या उत्पादनाचे कारखाने सुरू झाले आहेत. कामगार कारखानात येऊन काम करू लागले आहेत. कोरोनाचा प्रतिकार करीत असलेल्या संपूर्ण जगासाठी ही दिलासादायक बातमी असली तरी चीनविरुद्ध अनेकांना शंका येऊ लागल्याचं दिसत आहे.

हुबेईची राजधानी वुहानमध्येही परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे या भागात आता कामगार कामावर परतू लागले आहेत. कारखान्यातील सर्व काम पुन्हा सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी युरोप, अमेरिका आणि भारतानेही आपल्या येथील सर्व कारखाने तूर्त बंद केले आहेत. पण दुसरीकडे चीन या जागतिक महासाथीतून बाहेर पडला असून, तेथील हुबेई प्रांतात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

 

News English Summary: The world is worried about the lock down but also closed theaters in China for the past 2 months. More than 200 theaters are opening in Shanghai, China’s main city. 700 theaters have been opened in other parts of China and the government has offered a big discount on blockbuster cinema tickets. Old blockbuster movies will be shown in all these theaters. The Shanghai administration has issued some guidelines for opening the theater. The audience will have to check the body temperature when entering it. Also the end of the two seats should be kept at least 1 meter.

 

News English Title: Story Corona Virus China people watching blockbuster Movies 700 theaters News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x