17 April 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

७ दिवस शांत राहून शी जिनपिंग यांनी व्हायरस चीनमध्ये पसरू दिला; एसोसिएटेड प्रेसचं वृत्त

Covid19, Corona Crisis, China Covid19

बीजिंग, १७ एप्रिल: जगभरात २० लाखांहून अधिक लोकांना लागण झालेला आणि १ लाख ४१ हजारांवर बळी घेणारा कोरोना व्हायरस विषाणू प्रयोगशाळेत बनवला गेला असल्याची चर्चा पुन्हा पुन्हा होतं आहे. विशेष म्हणजे ही चर्चा होते तेव्हा प्रत्येक वेळी चीनकडे संशयाची सुई जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडले आणि चीनला पुन्हा एकदा त्यावर खुलासा करावा लागला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरस चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत निर्माण झाला का याबाबत त्यांचं सरकार शोध घेत आहे. तर चीननं याबाबत त्यांना काय माहिती आहे यावर स्पष्टीकरण द्यायला हवं, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पेओ यांनी यांनी म्हटलं होतं. चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्याने मात्र यावर थेट भाष्य करायचं टाळलं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत काहीही पुरावे नाहीत असं वारंवार स्पष्ट केल्याचं सांगून अमेरिकेचे आरोप फेटाळले.

दरम्यान चीननं जगासमोर कोरोना विषाणूसंबंधी माहिती उघड न केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. विशेष म्हणजे अमेरिका करत असलेल्या आरोपात तथ्य असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर ७ दिवस तो व्हायरस शी जिनपिंग यांनी चीनमध्ये पसरू दिला, त्याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. तसेच त्यांनी सात दिवस गप्प राहण्याची भूमिका घेतल्याचंही चिनी कागदपत्रांतून उघड झालं आहे.

एसोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, चिनी सरकारच्या अंतर्गत दस्तावेजातून याचा खुलासा झालेला आहे. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी १४ जानेवारीलाच सांगितलं होतं की, कोरोना व्हायरसच्या महारोगराईचा आपण सामना करत आहोत. परंतु त्यांनी सात दिवस लोकांना सतर्क केलं नाही. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महारोगराईशी दोन हात करण्याचा कर्मचाऱ्यांना आदेश दिला होता, परंतु वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांना सतर्क केलं नाही.

तत्पूर्वी, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मंगळवारी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार चीनमधील अमेरिकन दुतावासाने वुहानमधील वुहान इन्सटिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेमध्ये सुरक्षित पद्धतीने प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत २०१८ साली जानेवारी महिन्यात व्यक्त केले होते. येथील शास्त्रज्ञ वटवाघुळांमधून मानवाला होणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अभ्यास करत असल्याचेही यावेळी स्पष्ट कऱण्यात आलं होतं.

 

News English Summary: The Corona virus virus, which infected more than two million people worldwide and infected more than 1 million 41 thousand, is being debated again. Significantly, China is under suspicion every time it comes to discussion. US President Donald Trump once again reversed the debate on Wednesday, and China has to make it clear once again.

News English Title: Story Corona virus China president Jin Ping know about Covid19 did not tell people 7 days News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या