18 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोना आपत्तीमुळे मुस्लिमांनी हज यात्रेला येऊ नये; सौदी सरकारचे आवाहन

Covid 19, Corona Crisis, Hajj Yatri

रियाध, ०१ एप्रिल: कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगात आतापर्यंत ४२ हजार ३२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ८ लाख ५९ हजार ०३२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीननंतर अमेरिका आणि युरोपात परिस्थिती वाईट आहे.

अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारचा दिवस अमेरिकेसाठी काळा दिवस ठरला. करोनाच्या संसर्गाने एकाच दिवसांत तब्बल ९१२ जणांचा मृत्यू झाला. तर, तब्बल २४ हजार नवे रुग्ण आढळले. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकन सरकारची चिंता वाढली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेतील मृतांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे.

दरम्यान जगभरातील देश आता अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया सरकारने करोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी ‘उमरा’ ही तीर्थयात्रा स्थगित केली होती. त्यानंतर हज यात्रेवर स्थगिती येणार असल्याची चर्चा होती. सौदी अरेबिया सरकारचे हज मंत्री मोहम्मद बिन्तऐन यांनी शासकीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सौदी अरेबिया हज आणि उमरासाठी येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जागतिक महासाथीच्या काळात सौदी अरेबिया आपले नागरिक आणि मुस्लिमांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जगातील मुस्लिम बांधवांनी परिस्थिती पूर्वपदावर येण्याची प्रतिक्षा करावी असे आवाहनही त्यांनी केले.

 

News English Summary: Meanwhile, countries across the globe are seeing more caution. The Saudi Arabian government had postponed the pilgrimage ‘Umrah’ so as not to spread the infection. There was talk that the hajj pilgrimage would be postponed. Saudi Arabia’s Hajj Minister Mohamed Bintayin told a news agency that Saudi Arabia is eager to welcome the Hajj and Umrah citizens. However, in the current scenario, Saudi Arabia is committed to protecting the health of its citizens and Muslims during the World War. He urged the Muslim brothers around the world to wait for the situation to come to an end.

 

News English Title: Story Corona virus Covid 19 fear Saudi Srabia appeal Muslims should not come for Hajj News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x