5 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेने १ लाख शव बॅगेची मागणी केल्याने धास्ती वाढली

America Corona Crisis, Covid 19, President Donald Trump

वॉशिंग्टन डीसी, २ एप्रिल: जगात अमेरिका आणि कोरोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. अमेरिकत न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे कोलमडून पडलंय. मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधल्या सगळ्या जागा कमी पडत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रशासनापुढे प्रश्न पडलाय. एकट्या न्यूयॉर्क शहरात ११३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या ५११५ एवढी झालीय. अमेरिकेत पुढच्या काही महिन्यांमध्ये तब्बल २ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जगभरात करोनाच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इटली, स्पेन सारखे देश कोलमडून पडले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. अमेरिकेत मृत्यूंचे तांडव होण्याचा इशारा संशोधकांनी दिला असतानाच प्रत्यक्ष पेंटागॉनने एक लाख शव बॅगांची ऑर्डर दिल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेत सध्या २ लाख १६ हजार १५४ लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, ५ हजार ११५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान येत्या काळात मृतांच्या संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांच्या तब्बल ८०% रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सर्वात जास्त भार आहे.

 

News English Summary: The United States and Corona have become major centers in the world. In the United States, New York City has collapsed due to Corona. The death toll is so high that all the places in hospitals are shrinking. In other cities this is the same situation as coffins and ‘body bags’ are being dropped to cover and store the bodies. As such, there has been a question before the administration on how to dispose of the bodies. In New York City alone, 1,139 people have died. In the United States, the number has grown to 5,115. Some experts fear that as many as 2 million people will die in the United States in the next few months.

 

News English Title: Story Corona virus crisis in America Pentagon seeking 100000 body bags for civilians News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x