18 January 2025 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे २७५१ जणांचा मृत्यू

Corona Crisis, Covid 19, America

वॉशिंग्टन, २२ एप्रिल: कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत एक लाख ७० हजार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये युरोपमधील एक लाख सहा हजार ७३७ जणांचा समावेश आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४२ हजार ३६४ जणांचा, इटलीमध्ये २४ हजार ११४ जणांचा, स्पेनमध्ये २१ हजार २८२ जणांचा, फ्रान्समध्ये २० हजार २६५ जणांचा आणि ब्रिटनमध्ये १६ हजार ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी आहे.

परंतु, अमेरिकेत या विषाणूने अक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका आता अमेरिकेला बसल्याचे जाणवत आहे. अमेरिकेत मृत्यूचा नवा विक्रम नोंदला जात आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे २७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने ही माहिती दिली आहे.

जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोविड-१९ विषाणूमुळे आतापर्यंत ८००००० प्रकरणे समोर आली आहेत. तर ४४८४५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर सोमवार आणि मंगळवारी कोरोनाच्या नवीन ४०००० प्रकरणांची नोंद झाली आहे.

 

News English Summary: The virus has become infectious in the United States. Corona’s biggest hit now seems to be sitting in the United States. A new death record is being set in the United States. In the past 24 hours, 2751 people have died in the United States due to the Corona virus. This information was provided by Johns Hopkins University on Tuesday.

News English Title: Story Corona virus Death toll in america 2700 dead in USA from Covid 19 in last 24-hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x