18 January 2025 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोना लस संशोधनाला यश...इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचं ट्विट

Israel, Corona Vaccine, biological institute, Amichai Stein

जेरुसलेम, ५ मे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील सर्व देश सध्या कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नांत आहेत. दरम्यान इस्रायल जगातील अशा देशांमध्ये सामील झाला आहे जो कोव्हिड-19विरुद्धच्या युद्धात आशेचा किरण दाखवत आहे. एप्रिलमध्ये इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना लसीचा शोध घेण्यास सुरुवात केली, दरम्यान त्यांना आता मोठा शोध लागल्याचे इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

इस्त्रायली संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले आहे. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अँटीबॉयटिक्स तयार केले जातील, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी याबाबत माहिती दिली.

नफताली बेनेट म्हणाले की, कोरोना व्हायरस लसीच्या विकासाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतात इस्रायलकडून तंत्रज्ञान घेईल असं सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: Amichai Stein said Joint statement by the Israeli Ministery of Defense and the Israel Institute for Biological Research: A significant breakthrough has been achieved in finding an antidote to the Corona virus that attacks the virus and can neutralize it in the sick body. According to the Institute’s researchers: “The antibody development phase is over. A goal for international companies to produce the antibody in commercial quantities ”

News English Title: Story corona virus defense minister Amichai Stein claims Israels biological institute developed virus antibody News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x