5 November 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

सिगारेटमधील निकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, फ्रान्समध्ये संशोधन सुरु

Covid 19, Corona Crisis, France, testing nicotine

पॅरिस, २४ एप्रिल: करोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. वेगवेगळया देशांमध्ये करोना व्हायरस विरोधात लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता संशोधन सुरु आहे. निकोटिनमुळे करोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, फ्रान्समधल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ‘फ्रांस-२४’ या स्थानिक वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.

पॅरिसमधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये या संदर्भात संशोधन करण्यात आले. त्यामध्ये एकूण ३४३ कोरोनाबाधित रुग्णांची माहिती जमा करण्यात आली. त्यापैकी १३९ रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे होती. या रुग्णांमध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या देशाच्या एकूण धुम्रपान करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत खूप कमी होती. संशोधनासाठी तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्केच रुग्ण हे धुम्रपान करणारे असल्याचे आढळले, अशी माहिती या रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्राध्यापक आणि संशोधनाचे सहलेखक जाहिर अमूरा यांनी दिली.

फ्रान्समध्ये जवळपास ३५ टक्के नागरिक धूम्रपान करतात. पॅरिसच्या रुग्णालयात दाखल असलेल्या करोना बाधितांपैकी फक्त पाच टक्के रुग्णांना धूम्रपानाची सवय आहे. फ्रान्समधल्या संशोधकांचा अभ्यास मागच्या महिन्यात न्यू इंगलंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीशी मिळता-जुळता आहे.

दरम्यान, इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये गेल्या महिन्यात एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. हे संशोधन चीनमधील होते. चीनमधील कोरोनाबाधित १००० रुग्णांमध्ये १२.६ टक्के रुग्ण हे धुम्रपान करणारे होते. चीनमध्ये एकूण लोकसंख्याच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्यांची संख्या २६ टक्के इतकी आहे. कोरोना विषाणूचा शरीरातील पेशीमध्ये शिरकाव करणे निकोटिनमुळे रोखले जाऊ शकते, असे या संशोधनामागील आधार आहे.

 

News English Summary: The research was conducted at a large hospital in Paris. A total of 343 coronary artery disease data were collected. Of those, 139 patients had mild symptoms. The number of smokers in these patients was much lower than the total number of smokers in the country. Of the patients examined for the research, only five per cent were found to be smokers, said Jahir Amura, a professor in the hospital’s medicine department and co-author of the research.

News English Title: Story corona virus France testing if nicotine can protect people from contracting Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x